Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लोकोत्सव’ धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा…वाचा रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळाची संपूर्ण रूपरेषा!

छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहासप्रेमी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

'लोकोत्सव' धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहीरांचा...वाचा रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळाची संपूर्ण रूपरेषा!
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 4:49 PM

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर 5 व 6 जून 2022 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. यंदा ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची (Maharashtra), ‘जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असणार आहेत. देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. युगपुरुष छत्रपती शिवरायांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी केली.

शिवराज्याभिषेक महोत्सव

अठरा अनुतेदार, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्यात ऐक्य घडवले. शत्रूवर जरब बसवत रयतेला स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. छत्रपती शिवरायांचा 6 जून 1674 सा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला छत्रपती मिळाने महाराष्ट्रासह देशभरात ही घटना इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेणारी ठरली. हा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन तो ‘राष्ट्रीय सण’ म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे.

सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार

छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहासप्रेमी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. यंदा गडावर पाच जूनला सायंकाळी पाच वाजता ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’ हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार.

हे सुद्धा वाचा

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक

गलका यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे व सायंकाळी सात वाजता राज दरबार येथे ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा शाहीरी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर 6 जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर सोहळा पालखीना, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अनुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपापल्या पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर घालणार आहेत.

news photo

राज्याभिषेकाची सोहळ्याची रुपरेषा अशी

5 जून 2022

-दुपारी. 4:00 – संभाजी छत्रपती महाराज व शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवेत पायी गड, चित्त दरवाजा

-सायंकाळी. 5:00 गडपूजन, स्थळ : नगारखाना. सायं. 5:00 – ‘धार तलवारीची.. युद्धकला महाराष्ट्राची’. स्थळ- होळीचा माळ. सायं. 6:00 गतवैभव रायगडाचे, कार्य रायगड विकास प्राधिकरणाचे’ या विषयावर विस्तृत सादरीकरण. स्थळ : हत्तीखाना

-सायंकाळी. 7:00 – जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’. स्थळ : राज दरबार

-रात्री 9:00 – गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ. स्थळ : शिरकाई मंदिर, रात्री 9:30 – जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन, जागर व काकड आरती. स्थळ- जगदीश्वर मंदिर,

-रात्री 9:00 – अन्नछत्र. स्थळ : जिल्हापरिषद धर्मशाळा आणि पायथा.

6 जून 2022

-सकाळी. 6:00 ध्वजपूजन, ध्वजारोहन व जयघोष रणवाद्यांचा. स्थळ नगारखाना.

-सकाळी. 6:50 – शाहिरी कार्यक्रम स्थळ : राज दरबार

-सकाळी. 9:30 – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन. स्थळ राजसदर.

-सकाळी. 9:50 युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत

-सकाळी. 10:10 युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक.

-सकाळी. 10:20 – मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक.

-सकाळी. 20:25- प्रास्ताविक : अध्यक्ष, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती. स.

-काळी10.20 – युवराज संभाजी छत्रपत्ती महाराज यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन,

-सकाळी. 11:00 – ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ.

-दुपारी. 12:00 – जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप.

-दुपारी. 12:10 – युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.