‘हो, बारसूत माझ्या नातेवाईकांच्या जमिनी’, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलून गेले?
"खासदार विनायक राऊत मगाशी सांगत होते ना, साहेब आमच्याकडे तो एक आहे ना, आणि त्याच्याबरोबर दोन फ्री. त्याची म्हणे आता एवढी पंचायत झालेली आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं मी नाही. त्यांना आता काय सांभाळावं ते कळतंच नाही. दोन पोरं सांभाळायला गेला तर डोक्यावरचा टोप पडतो", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
रायगड : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची महाडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. “खासदार विनायक राऊत मगाशी सांगत होते ना, साहेब आमच्याकडे तो एक आहे ना, आणि त्याच्याबरोबर दोन फ्री. त्याची म्हणे आता एवढी पंचायत झालेली आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं मी नाही. त्यांना आता काय सांभाळावं ते कळतंच नाही. दोन पोरं सांभाळायला गेला तर डोक्यावरचा टोप पडतो. तोफ सांभाळायला गेला तर पोरं सुटतात. त्यामुळे सुक्ष्म माणसावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर केली.
“रोज वाट्टेत ते बोलतात. बोलू द्या. त्याच्यावर त्यांचं पोट चालतंय. उद्धव ठाकरेकडून तुम्ही सगळं काही काढून घेतलं तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते? उद्धव ठाकरेला संपवायचं आहे ना, संपवा. बे बघा हे माझे कुटुंबिय आहेत. हे सगळे कुटुंबिय आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“बारसूत तमाशा केला. बारसूत म्हणे उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत. मी म्हटलं, हो आहे. लोकं सांगत आहेत, नाही हे खोटंय. मी म्हटलं. नाही तसं नाही. बारसूत माझ्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत. तुम्ही सगळे माझे नातेवाईक आहेत. आता जर लढायला बळ आलं तर मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय. त्यांना सुद्धा बळ आलंय की उद्धव ठाकरे त्यांचा नातेवाईक आहे. अरे मी तर माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय. तुम्ही तर उपऱ्यांसाठी लढत आहात. ज्यांच्याशी तुमचं काहीच देणंघेणं नाही. माझा महाराष्ट्र तुम्ही मारत आहात”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?
काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही. एक समाधान आहे, माझ्यावर आरोप केल्याने भाकरी मिळते हेही नसे थोडकं, आज जगताप कुटुंब आपल्यासोबत आले आहेत. मी सगळ्यांचं शिवसेनेत स्वागत करतो. मी असं म्हणत होतो की, मातोश्रीत प्रवेशाचा कार्यक्रम घेऊया आणि महाडमध्ये सभा घेऊ. पण ऐकतील ते जगताप कुटुंबिय कसले? त्यांनी हट्टच धरला. इथेच या ऐतिहासिक मैदानात सभा घेणार म्हणून इथे आलो
स्नेहल ताई आणि जगताप कुटुंबिय काँग्रेसमधून आल्या. काही जणांच्या भुवया उंचावल्या. काही जणांच्या पोटामध्ये गोळा आला. पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नाही एक लाख टक्के जप्त. मग आता कसं होणार? काँग्रेसमधून शिवसेनेत आले, शिवसैनिकाचं काय होणार? अरे काय होणार काय? गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी डोक्यावर चढवला. तसं आपण काही करत नाही आहोत. आपण त्यांना काहीही न देता ते आपल्याकडे आले आहेत.
मला नेहमनी आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं, सत्तेकडे सगळे जातात. आज तर माझ्याकडे सत्ता नाहीय. आपल्याच लोकांनी गद्दारी केली आणि शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचलं आणि स्वत: तिकडे बसले. ज्यांनी त्यांना फूस लावली, म्हणडे भाजपने, जाऊदे शब्द कमी पडतील. कारण मी मध्ये बोललो होतो त्याने वाद झाला होता.
भाजपने एवढा नीच डाव केला की आपलं चिन्ह आणि धनुष्यबाण चोरलं आणि ते त्यांच्या खोक्यावर मारलं. मी आज केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन आलो आहे. बाकी माझ्याकडे काहीच नाही. तरीसुद्धा तुम्ही एवढे प्रचंड संख्येने आलेले आहात, जगताप कुटुंबिय आले आहेत, अद्वय हिरे आले. आणखी काही जण येणार आहेत. पण असं आश्चर्य याआधी पाहिलं नव्हतं.
महाविकास आघाडी म्हणून मी पुढे जातोय मग मी काँग्रेस फोडतोय का? तसं नाहीय. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार जिंकला, शिवसैनिकांनी मेहनत घेतली. नुसती जिंकून आणण्यासाठी मेहनत घेतली नाही. तर आपला उमेदवार लिंगाडे आपला शिवसैनिक तिकडे दिला आणि तिकडे तो आमदार झाला. कारण एवढ्या एकजुटीने लढल्याशिवाय समोर जी हुकूमशाही वृत्ती उभी आहे तिचा पराभव करणार आहोत
महाड मतदारसंघ शिवसेनेचा आहे. तो केवळ निवडणुकीपुरता नाही. मी कागदावर लिहून ठेवलं आहे की एकही मतदारसंघ सुटता कामा नये. फटाके सुद्धा शिवसैनिकासारखे एकदा पेटले तर ऐकत नाहीत. म्हणून कोणी शिवसैनिकाला पेटवायचा प्रयत्न करु नये. कारण मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजण्याशिवाय राहणार नाहीत.
तळीयागावात दरड कोसळली. किती जणांना घरे मिळाली? दोन वर्ष झाली. माझ्याकडे नावं आहेत. तळीया गावात 71 घरं स्थलांतरीत झाली, त्यातील 66 नष्ट झाली. जेवढी घरं द्यायची होती त्यापैकी फक्त 15 घरं तयार आहेत.