“ठाकरे जिथं उभा राहतील, तोच त्यांचा बालेकिल्ला”; ठाकरे गटाने राणे पिता पुत्रांना पु्न्हा सुनावलं

देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, फडणवीस पुन्हा येईन म्हणाले होते त्याप्रमाणे ते पुन्हा आले आहेत, मात्र एकदा विरोधी पक्षनेते म्हणून आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून आले असल्याचा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

ठाकरे जिथं उभा राहतील, तोच त्यांचा बालेकिल्ला; ठाकरे गटाने राणे पिता पुत्रांना पु्न्हा सुनावलं
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 6:37 PM

महाड : राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाराष्ट्राचे राजकारण प्रचंड ढवळून निघाले आहे. ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच कोकणातील राजकारणामुळेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना, भाजपसह राणे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे महाडमध्ये आल्या असताना त्यांनी सत्ताधारी आणि नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

महाडमध्येही आता राजकारण ढवळून निघाले आहे. सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहल जगताप यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी सांगितले की, जगताप यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला नक्कीच फायदा होणार आहे.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे जिथे उभे राहतील तोच त्यांचा बालेकिल्ला असतो असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.

कोकण, रायगडने ठाकरे गटाला नेहमीच भरभरून दिले आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून कोकणातील जनतेने शिवसेनेवर उदंड प्रेम केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी उभा राहतील तोच त्यांचा बालेकिल्ला होत असतो असंही त्यांनी यावेळी विश्वासानं सांगितले.

रायगडने ठाकरे आणि शिवसेनेला भरभरून दिलेले आहे. त्यामुळे आताही जगताप यांच्या पक्ष प्रवेशामुळे राजकीय समीकरणांची बरीचशी उकल होणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी त्यांनी स्नेहल जगताप यांच्याही पाठीशी उद्धव ठाकरे यांची ताकद आता उभी राहिल्याने येथील राजकीय समीकरणं बदलणार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे गटाच्या सभेवरूनही ठाकरे गटावर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली जाते, त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, कुणाला दाखवायची म्हणून ही आमची सभा नाही तर लोकांच्या प्रेमामुळे ठाकरे गटाची सभा अलोट गर्दीत पार पडत असते असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

सुषमा अंधारे यांनी राणे पिता पुत्रावर बोलत असताना त्यांच्याविषयी आणि नितेश राणे यांच्याविषयी काहीही बोलावसं वाटत नाही असा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. राणे यांना किती आणि कसं गांभीर्याने घ्यायचं असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

बारसू प्रकरणावरून झालेल्या राजकारणावर बोलताना त्या म्हणाल्या की, बारसूत हिंग लावूनही लोकांनी त्यांना विचारलं नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला.

तर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, फडणवीस पुन्हा येईन म्हणाले होते त्याप्रमाणे ते पुन्हा आले आहेत, मात्र एकदा विरोधी पक्षनेते म्हणून आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून आले असल्याचा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

दिल्लीश्वरांच्या येथे फडणवीसांविरोधात मोठा गट कार्यरत असून देवेंद्र फडणवीस पुढील काळात येतील पण विरोधी पक्षांचे नेते म्हणून येतील अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.