Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pen Crime : पेणमध्ये स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले, 56 लाखाची रक्कम लंपास

दरोड्याची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाकरीता फॉरेन्सिक पथकही पाचारण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे. दरोडेखोरांनी एटीएम फोडण्यासाठी आणलेला गॅस कटर व सिलेंडर एटीएममध्येच टाकून पलायन केले.

Pen Crime : पेणमध्ये स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले, 56 लाखाची रक्कम लंपास
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 9:50 PM

पेण : शहरातील मुख्य रस्त्यावरील सनसिटी इमारतीमधील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी 56 लाख 34 हजार 800 रुपये लंपास केले. काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी तरणखोप येथील बंगला व एका रात्रीत 14 दुकाने फोडल्याची घटना ताजी असतांनाच काल पुन्हा दरोड्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. चोरांनी पेण पोलीसांना सरळ सरळ आव्हानच दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. (Theft at State Bank ATM in Pen, Rs 56 lakh looted)

दरोड्याची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाकरीता फॉरेन्सिक पथकही पाचारण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे. दरोडेखोरांनी एटीएम फोडण्यासाठी आणलेला गॅस कटर व सिलेंडर एटीएममध्येच टाकून पलायन केले. पेण शहरात एका मागोमाग एक अशा अनेक चोरीच्या घटना होत असल्याने चोरांनी व दरोडेखोरांनी पेण पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

गेल्या महिन्यात एका रात्रीत 14 दुकाने फोडली

मागील महिन्यात तरणखोप येथे एका घरात घरफोडी करीत दागिन्यांसह लाखो रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. तसेच पेण शहरातील मुख्य मार्गावरील 14 दुकाने चोरांनी एकाच रात्रीत फोडून चोऱ्या केल्या होत्या. याप्रकरणी आठ दुकानदारांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती. सदरची घटना ताजी असतानाच आज पहाटे शहरातील सनासिटी बिल्डिंगमधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य रस्त्यावरील एटीएम दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून 56 लाख 34 हजार 800 रुपयांची रोकड लंपास केली.

नांदेडमध्येही एका रात्रीत तीन दुकाने फोडली

नांदेडमधील नायगाव शहरात चोरट्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील तीन दुकानात चोरी केली. तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. दोन खत दुकान, एक आडत दुकानातील चोरीच्या घटनेत दोन लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या चोरीच्या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे प्रमाण वाढलेय.

पंधरा दिवसांपूर्वी मांजरम येथे दिवसा धाडसी चोरी झाली यात लाखो रुपयाचा ऐवज लंपास करण्यात आला. तर दोन दिवसांपूर्वी गडगा येथे किराणा दुकानात झालेल्या चोरीची घटना ताजी असताना सोमवारी रात्री चोरट्यांनी नायगाव शहरातील पाच दुकाने फोडली. यात चोरट्यांनी मातोश्री अँग्रो एजन्सीच्या शटर वाकवून दुकानात प्रवेश केला व गल्ल्यातील 1 लाख 86 हजार रुपये चोरले. दुसऱ्या घटनेत प्रगत शेतकरी केंद्रातून 5 हजार तर मोंढ्यातील व्यंकटराव पाटील चव्हाण यांच्या आडत दुकानातील कपाट फोडून दहा हजार लंपास केले. पण बालाजी ट्रेडिंग कंपनी, गजानन किराणा दुकानात चोरीचा प्रयत्न फसला. (Theft at State Bank ATM in Pen, Rs 56 lakh looted)

इतर बातम्या

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, आरोपी तरुणाला अटक

Thane Accident : खोणी तळोजा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.