रायगडमध्ये महिला सरपंचाची हत्या, ‘ऑस्कर’नं वास घेत आरोपीला पकडलं, वाचा संपूर्ण घटनाक्रम

रायगड जिल्ह्यातील महिला सरपंचाच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाच्या ऑस्कर या डॉबरमॅन प्रजातीच्या श्वानाची मोठी मदत झाली आहे.

रायगडमध्ये महिला सरपंचाची हत्या, 'ऑस्कर'नं वास घेत आरोपीला पकडलं, वाचा संपूर्ण घटनाक्रम
उमेश भटकर यांचा लाडका श्वान ‘जॉन’
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 11:26 AM

रायगड : महिला सरपंचाची हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकल्याची घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. संबंधित महिला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची सरपंच होती. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाच्या ऑस्कर या डॉबरमॅन प्रजातीच्या श्वानाची मोठी मदत झाली आहे. या महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यासाठी आरोपीने जी फळी वापरली होती, तीचा वास या श्वानाला दिल्यानंतर या ट्रॅकर श्वानाने आरोपीचा माग काढला. याबाबत टाईम्स ऑफ इंडियामध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.

असा काढला माग

याबाबत माहिती देताना रायगड बॉम्ब शोधक पथकाचे कॉन्स्टेबल दर्शन सावंत यांनी सांगितले की, जंगलामध्ये एका महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेमध्ये पडल्यची माहिती आम्हाला मिळाली होती. या प्रकरणात तपास सुरू असताना आरोपीचा माग काढण्यासाठी आम्ही ऑस्करला घटनास्थळी नेले. तेथे या महिलेवर ज्या लाकडी फळीने हल्ला करण्यात आला होता, त्या लाकडी फळीचा वास आम्ही या श्वानाला दिला. त्यानंतर हा श्वास मग काढत जवळच असलेल्या गोठ्यात शिरला, त्यामुळे आम्हाला आरोपीची ओळख पटण्यास मदत झाली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

यापूर्वीही अनेक तपासात मदत

सावंत पुढे बोलताना म्हणाले की, ऑक्सर आता तीन वर्षांचा झाला आहे. तो सात महिन्यांचा असताना त्याला बॉम्ब शोधक पथकात दाखल करून घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला गुन्ह्याच्या तपासासाठी ट्रॅकर डॉग म्हणून नऊ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. ऑस्करने यापूर्वी देखील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या एका खुनाच्या तपासात मदत केली होती. ऑस्कमुळेच त्या खूनातील आरोपी जेरबंद झाला होता. दरम्यान या प्रकरणातील पीडिता ही नग्न अवस्थेत आढळल्याने तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय आहे, याकरत आम्ही फॉरेन्सिक अहवाल देखील मागवला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी यावेळी दिली. या प्रकरणातील आरोपीला चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Mata Vaishno Devi | माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात रात्री 2:45 ला काय झाले? कशी झाली चेंगराचेंगरी?

Nashik Accident| माहिती सहायक पाटील यांचा अपघाती मृत्यू; कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ

Nagpur Crime | मध्यप्रदेशातून येत होता बनावट मद्यसाठा, राज्य उत्पादन शुल्क विभागानं टाकला छापा; 15 लाखांची दारू जप्त

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.