AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Bribe : रायगडमध्ये लाच स्वीकारताना शाखा अभियंत्याला लाचलुचपत विभागाने पकडले

सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्‍यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या डीवायएसपी सुषमा सोनावणे यांच्‍या नेतृत्‍वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता.

Raigad Bribe : रायगडमध्ये लाच स्वीकारताना शाखा अभियंत्याला लाचलुचपत विभागाने पकडले
रायगडमध्ये लाच स्वीकारताना शाखा अभियंत्याला लाचलुचपत विभागाने पकडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 5:04 PM

रायगड : प्रलंबित बिल मंजूर करण्‍यासाठी 10 हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना रायगडमध्ये शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. भोजवंत शिंदे असे सदर अभियंत्याचे नाव असून तो रायगड जिल्‍हा परिषदेच्‍या रोहा येथील बांधकाम विभागाच्‍या कार्यालयात कार्यरत आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (Bribery Prevention Department)ने शिंदे यास अटक (Arrest) केली आहे. तक्रारदार यांचे शेणवई येथील सामाजिक सभागृहाच्या कामाचे बिल बांधकाम विभागात प्रलंबित होते. ते बिल काढण्यासाठी शाखा अभियंता भोजवंत शिंदे यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

यानंतर सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्‍यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या डीवायएसपी सुषमा सोनावणे यांच्‍या नेतृत्‍वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. त्यानुसार ठरल्या वेळी दुपारच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून 10 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने भोजवंत शिंदे यास रंगेहाथ पकडले. भोजवंत शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

सांगलीत एक हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

एक हजार रुपयांची लाच घेताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. एका रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी ही लाच स्वीकारण्यात येत होती. रवीशंकर चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. चव्हाण मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. एका वडाप रिक्षा चालकाकडे कारवाई न करण्यासाठी रवी चव्हाण याने एक हजार रुपये लाचेची मागणी 10 जून रोजी केली होती. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर 15 जून रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर सापळा रचून रिक्षा चालकाकडून एका हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रवीशंकर चव्‍हाण यांना रंगेहाथ पकडले आहे. (While accepting bribe in Raigad, the branch engineer was caught by the bribery department)

हे सुद्धा वाचा

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....