कोरोनाबाधित रुग्णांच्या वॉर्डमध्ये रोबो औषधं पुरवणार, सोलापूर रेल्वे विभागाचा अनोखा प्रयोग

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांनादेखील (Special robot for Corona patients) कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या वॉर्डमध्ये रोबो औषधं पुरवणार, सोलापूर रेल्वे विभागाचा अनोखा प्रयोग
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 4:43 PM

सोलापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांनादेखील (Special robot for Corona patients) कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सोलापूर रेल्वे विभागाने अवघ्या तीन ते चार दिवसात रोबोची निर्मिती केली आहे. हा रोबो कोरोनाबाधित रुग्ण दाखल असलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणार आहे. त्यामुळे रुग्णांचा डॉक्टर आणि नर्सेस यांच्याशी जास्त संपर्क येणार नाही. या रोबोमुळे संसर्गाचा धोका कमी होईल, अशी माहिती रेल्वे विभागाच्या डॉक्टरांनी दिली आहे (Special robot for Corona patients).

सोलापूर रेल्वे विभागाच्या यांत्रिक विभागाने अवघ्या चार दिवसात हा रोबो बनवला आहे. विशेष म्हणजे देशातील रेल्वे विभागाचा हा पहिला प्रयोग आहे. या रोबोमार्फत कोरोनाग्रस्त रुग्णांना सुविधा पुरविल्या जाणार आहेत. हा रोबो कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वॉर्डात औषधं पोहोचवण्याचं काम करेल. याशिवाय ऑडियो-व्हिडीओच्या माध्यमातून तो रुग्णांशी संवादही साधणार आहे.

कोरोनाबाधित रुग्ण आयसोलेश वॉर्डमध्ये दाखल असतात. या वॉर्डमध्ये डॉक्टर आणि नर्सेस यांची सारखी ये-जा असते. मात्र, आता हा रोबो आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणार असल्यामुळे डॉक्टर आणि नर्सेस यांची ये-जा कमी होईल. त्यामुळे रुग्णांशी डॉक्टर आणि नर्सेस यांचा संपर्क कमी होईल आणि संसर्गाचा धोका कमी होईल.

कोरोनावर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये हा रोबो वापरण्यात येणार आहे. या रोबोमार्फत डॉक्टर रुग्णांवर लक्ष ठेवणार आहेत. मोबाईलद्वारे या रोबोचे ऑपरेटिंग होणार आहे. यासाठी प्रात्याक्षिक घेण्यात आले असून लवकरच हा रोबो रुग्णालयात कार्यान्वित करण्यात येणार आहे.

याअगोदर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभाई रुग्णालयात असा प्रयोग करण्यात आला आहे. या रुग्णालयात रोबो 50 मीटर ते 70 मीटरच्या अंतरावर रिमोटच्या मदतीने काम करतो. एका बटणाच्या क्लिकवर हा रोबो कोरोना पेशंटच्या बेडपर्यंत जेवण, पाण्याची बॉटल, औषधे इत्यादी वस्तू घेऊन जातो. दररोज दिवसातून किमान दोन किंवा तीन तास हा रोबो काम करतो. या रोबोमुळे एकाचवेळी 20 ते 25 किलो जेवण, नाश्ता आणि औषधं नेण्याची सोय झाली आहे. या रोबोसाठी 45 ते 50 हजारांचा खर्च आला.

संबंधित बातम्या :

सात दिवस, 64 विमानांची उड्डाणे, तेरा देशांत अडकलेले 14 हजार 800 भारतीय मायदेशी परतणार

अकोल्यात एकाच दिवसात कोरोनाचे 11 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 75 वर

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.