दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडणं अशक्य; रेल्वेने राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारला

महिलांसाठी दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडण्याचा प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेने फेटाळला आहे. महिलांसाठी दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडणं अशक्य असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडणं अशक्य; रेल्वेने राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारला
Central Railway
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 3:44 PM

मुंबई: महिलांसाठी दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडण्याचा प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेने फेटाळला आहे. महिलांसाठी दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडणं अशक्य असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. (railways responds to start local)

कोरोनाच्या आधी पश्चिम रेल्वेवर दररोज 35 लाख प्रवासी प्रवास करायचे. मात्र आता एका लोकलमध्ये 700 प्रवाशी दिवसाला प्रवास करत असून दिवसाला एकूण 9.6 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरू करायचे असल्यास आधी तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी एखादा उपाय शोधावा लागेल. पश्चिम बंगाल राज्यसरकारने ज्या पद्धतीने लोकल आणि गर्दीचं नियोजन केलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील विचार करत आहे असे आधी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले होते. या तांत्रिक उपायांसाठी जी मदत लागेल ती करण्यास रेल्वे तयार आहे, असं पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे.

सरकारने प्रत्येक तासाला एक लेडीज स्पेशल चालवण्याचे सांगितले आहे. मात्र आधीपासून सर्व लेडीज स्पेशल लोकल सुरू आहेत. तसेच प्रत्येक लोकलमध्ये 23 टक्के जागा लेडीज प्रवाशांसाठी राखीव आहेत. त्यामुळे प्रत्येक तासाला लेडीज स्पेशल चालवल्यास स्टेशनवर महिला प्रवासी वाट बघत उभे राहतील, तसेच पुरुष प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱ्या कमी होतील, यामुळे स्थानकावर गर्दी वाढेल, असं पश्चिम आणि मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. गर्दी झाल्यास कोविडचे नियम कसे पाळणार? असा सवालही रेल्वेने केला आहे.

सध्या यूटीएस ॲपद्वारे रेल्वेचे तिकीट बुक करणे बंद ठेवण्यात आले आहे, मात्र सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास तिकीट काऊंटर सोबतच या ॲपवरून तिकीट बुकिंग सुरू करावी लागेल. मात्र त्यात देखील कॅटेगरीनुसार तिकीट देण्याचे तंत्रज्ञान असल्याने सरकारला त्याबाबत विचार करावा लागेल, असं पश्चिम आणि मध्य रेल्वेनं म्हटलं आहे. आता सुरू असलेल्या 704 लोकल सर्व्हिसच्या बदल्यात पश्चिम रेल्वे आधी प्रमाणे पूर्ण क्षमतेने 1367 लोकल फेऱ्या चालवू शकेल. मात्र, सरकारने जीआरपी आणि आरपीएफसोबत काम करण्यासाठी राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेची मदत घेणे आवश्यक ठरणार आहे. या संदर्भात लवकरात लवकर सर्व प्रशासनाची बैठक होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. (railways responds to start local)

संबंधित बातम्या:

लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकारची चाचपणी, रेल्वेला पत्र

(railways responds to start local)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.