Imd Rain Forecast : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरु असताना चार दिवस पावसाचे, हवामानाचे दुहेरी संकट

october hit and rain: राज्यात ९ व १० विदर्भातील ११ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच १० व ११ ऑक्टोबरला खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण व मराठवाडा या भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटीसह किरकोळ पावसाचीच शक्यता आहे.

Imd Rain Forecast : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरु असताना चार दिवस पावसाचे, हवामानाचे दुहेरी संकट
october hit and rain
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 5:09 PM

राज्यात सध्या सर्वत्र ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत आहे. तापमान चांगलेच वाढल्यामुळे नागरिक घामाघूम होत आहे. त्याचवेळी आता राज्यात पावसाचेही कमबॅक होत आहे. राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे. आता ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गडगडाटीसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

परतीचा पाऊस नंदुरबारपर्यंत

राज्यातील अनेक शहरांचे तापमान सध्या ३७ ते ३७ अंशावर गेले आहे. त्याचवेळी परतीचा पाऊस महाराष्ट्रच्या उंबरठ्यावर आहे. हा पाऊस नंदुरबारपर्यंत आला. आता येत्या २-३ दिवसांत तो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करणार आहे. त्यामुळे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पडणारा पाऊस परतीचा पाऊस असणार आहे.

या ठिकाणी पडणार पाऊस

राज्यात ९ व १० विदर्भातील ११ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच १० व ११ ऑक्टोबरला खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण व मराठवाडा या भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटीसह किरकोळ पावसाचीच शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात

मुंबई उपनगरातील अंधेरी, वांद्रे, गोरेगाव, मालाड, बोरीवली परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतही सकाळपासून ढगाळ वातावरणात होते. दुपारी तीननंतर अचानक रिमझिम पावसाला सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोंबर महिन्यात जाणवणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आता आलेल्या पावसामुळे त्यांना दिलासा मिळाला.

विदर्भातील काही भागांत पाऊस सुरु झाला आहे. अकोल्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. जवळपास 20 ते 25 मिनिट मोठा पाऊस झाला. आज दुपारी साडेतीन नंतर अकोल्यातील मोठी उमरी, शिवनी परिसर तसेच शहरातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. दुपारी दोनपर्यंत तापलेल्या उन्हानंतर काही वेळातच आकाशात ढगाळ वातावरण झाले आणि पाऊस सुरु झाला.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.