IMD UPDATE: पुणे, नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, राज्यात पुढील चार दिवस मुसळधार

Rain In Maharashtra: राज्यात अजून चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही भागांत यलो अलर्ट दिला आहे.

IMD UPDATE: पुणे, नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, राज्यात पुढील चार दिवस मुसळधार
गोदावरील नदीला आलेला पूर
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 8:15 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पुणे आणि नाशिकमध्ये रविवारी झालेल्या पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. यामुळे नाशिकमधील गोदावरी तर पुण्यातील मुळा-मुठा नदीला पूर आला आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील भागात पाणी शिरले आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भेट देणार आहे. राज्यात पावसाचा जोर अजूनही चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

24 तासांत 104 मिलिमीटर पावसाची नोंद

नाशिकमध्ये गेल्या 24 तासांत 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिकच्या गोदावरीला हंगामातील पहिला पूर आला आहे. गोदा घाट परिसरातील दुतोंडी मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी गेली आहे. नाशिकमध्ये पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी

पुण्यातील एकता नगर भागात अजूनही पाणी आहे. या ठिकाणाच्या सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी रविवारपासून एकता नगरमध्ये मुक्कामी आहेत. पुण्यात सध्या पावसाचे विश्रांती घेतली असली तरी एकता नगरमधील परिस्थिती जैसे थे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर

पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमधील पाहणी करत मुख्यमंत्री साधणार नागरिकांशी संवाद साधणार आहे. पुणे शहरात उद्धवलेल्या पूर सदृश्य परिस्थितीचा मुख्यमंत्री आज आढावा घेणार आहे. पाहणीनंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मुख्यमंत्री आढावा घेणार आहे.

पुणे शहरासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु हवामान विभागाने पुण्याला आजही ऑरेंज अलर्ट दिला आहे. रविवारी संध्याकाळ नंतर पुण्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. धरण क्षेत्रातून नद्यांमध्ये विसर्ग अद्याप ही सुरू आहे.

राज्यात चार दिवस पावसाचा जोर

राज्यात अजून चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही भागांत यलो अलर्ट दिला आहे.

सांगलीत कृष्णा नदीची पातळी कमी

गेल्या 24 तासांत कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी रविवारी सकाळी होती 39 फूट 11 इंच तर सोमवारी सकाळी पाणी पातळी 39 फूट आली आहे. गेल्या 24 तासांत फक्त 11 इंचने नदीचे पाणी कमी झाले आहे. गेली 5 दिवस कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 40 आणि 39 फुटावर स्थिर आहे. कृष्णा नदीची इशारा पातळी आहे 40 फूट तर धोका पातळी आहे 45 फूट आहे. सध्या कोयना धरणातून 50 हजार क्यूसेक्स आणि चांदोली धरनातून 10 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर अजूनही पाण्याखाली

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर अजूनही पाण्याखाली आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुठा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह अद्यापही सुरू आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे भाविकांना दर्शन घेता येत नाही. मंदिर प्रशासनाकडून अद्यावत पूजा विधी करण्यात आला आहे.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.