BMC निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची हातमिळवणी ?, शिंदे यांचे काय होणार ?
एकीकडे एखाद्या छोट्या राज्याहूनही अधिक बजेट असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका जिंकून ती ताब्यात घेण्यासाठी बलाढ्य भाजपा सरसावली असताना महाराष्ट्रातच्या राजकारणात ठाकरे बंधूंकडून झालेल्या मनोमिलनाच्या विधानांनी खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब चर्चेत आले आहे. शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे पक्षाचे ( UBT ) नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू मनसेचे नेते राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का याची चर्चा सुरु झाली आहे. आता हे दोघे खरंच एकत्र येणार की दोन्ही नेते केवळ अटी आणि शर्थी घालून वातावरण करीत आहेत हे येणारा काळच सांगणार आहे. ठाकरे कुटुंबातील हा वाद खरंच संपला आहे का ? २० वर्षांनंतर दोन्ही भाऊ पुन्हा हात मिळवणार का? या मागे राजकीय मजबुरी आहे ? की राजकीय समीकरणं… ज्यामुळे हे दोघे बंधू चुकभुल द्यावी.. घ्यावी असं म्हणत आहेत…
महाराष्ट्राच्या राजकारणात पवार फॅमिली आणि ठाकरे फॅमिलीचा दबदबा मानला जात असतो. मुंबई – कोकण आणि मराठवाड्यातील शहरी भागात शिवसेनेचा दबदबा आजही कायम आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून नेहमीच मराठी अस्मितेचा आधार घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेने आधी मराठी अस्मिता, नंतर हिंदुत्वाचा आधार घेतला. शिवसेनेचे मतदार बहुंताशी मुंबईतील शहरी व्होट बँक राहीलेली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे पूत्र उद्धव ठाकरे यांनाच राजकीय वारसदार म्हणून घोषीत केले. आणि त्यानंतर पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण नावाचा पक्ष स्थापन केला आहे. काका बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरे यांची वक्तृत्वशैली असल्यामुळे त्यांच्या भाषणांना प्रचंड गर्दी जमत असते. परंतू सतत धोरणबदल केल्याने त्यांची विश्वासाहर्ता कमी झालेली आहे..




MNS वर संकट!
बाळासाहेब ठाकरे यांनी महाबळेश्वरच्या अधिवेशनात राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच उद्धव ठाकरे यांना आपला वारसदार म्हणून जाहीर केले. बाळासाहेब यांच्या हयातीत शिवसेनेत फूट पडून दोन्ही भावात वाद होऊन ते विभक्त झाले. १८ डिसेंबर २००५ रोजी त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपण शिवसेनेला सोडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांच्याकडे पाहून थेट बाळासाहेबांची छबी पाहात असल्याचे भासत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतू राज ठाकरे यांच्या पक्षाला नंतर घरघर लागली आता विधानसभेच्या निवडणूकात त्यांचे खातेही न घडल्याने पक्षाचे चिन्ह गमवण्याची वेळ आलीय..सध्या राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा बदलून हिंदूत्वाची लाईन पुन्हा पकडली आणि भाऊ उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला कटशह देण्यास सुरुवात केलीय…
उद्धव सेना दबावाखाली
साल २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी काडीमोड घेऊन महाविकास आघाडीची हातमिळवणी करीत महाविकास आघाडीचे सरकार बनवले. त्यात एनसीपी आणि काँग्रेसच्या त्यांचे सहकारी आहेत. दोन्ही पक्ष शिवसेनेच्या विचारांचे नसल्याने शिवसेनेचा मुख्य मतदार नाराज झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे MVA सोबत गेल्याने हिंदुत्ववादी व्होट बँक नाराज झाली. याचा परिणाम निवडणूकांतही झाला.
शिंदे सेनेला नेहमीच आव्हान
साल २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून ४० हून अधिक आमदारांना घेऊन भाजपाच्या महायुतीत सामील झाले. या भाजपाच्या पाठींब्यावर शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हांची लढाई निवडणूक आयोग आणि विधीमंडळात बहुमताने एकनाथ शिंदे यांना मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या करिष्मा घालवण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण वापर केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पारंपारिक व्होटबँकेला काबिज करण्याचे धोरण आरंभले आहे.
महाराष्ट्राचे राजकारणात आता तीन राजकीय ध्रुव आहेत. उद्धव ठाकरे ( शिवसेना- UBT ), राज ठाकरे ( मनसे ) आणि एकनाथ शिंदे ( निवडणूक मान्यता प्राप्त शिवसेना ) तिन्ही पक्ष मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा वापर करीत आपआपले अस्तित्व ठिकविण्याच्या मागे लागले आहेत.
निवडणूक निकालात काय झाले?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ( UBT ) एकूण 94 जागांवर निवडणूक लढली आणि केवळ 20 जागाच जिंकू शकली. . मुंबईतील 36 जागावर उमेदवारांपैकी केवळ 10 जागांवरच विजय मिळाला.. त्यातील प्रमुख जागा वरळी, माहिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, वांद्रे पूर्व या जागा आहेत.
माहिम मतदार संघात मनसे नेते राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे तिसऱ्या जागेवर राहीले. उद्धव ठाकरे यांचे उमेदवार माहिम मधून विजयी झाले. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विधानसभेत १२५ जागांवर निवडणूका लढवल्या होत्या परंतू त्यांचा कोणताही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे राज ठाकरे स्वत: ची इभ्रत वाचविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांचे निवडणूक चिन्हं इंजिन गमावण्याची वेळ आली आहे. मुंबईतील ३६ जागांवर मनसेने २५ उमेदवार उतरवले होते. मुंबईत राज ठाकरे , उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असा तिरंगी सामना झाल्याने शिंदे गटाला अपयश आले.
उद्धव आणि राज यांचे पॅचअप
मुंबईत शिवसेनेच्या कामगार सेनेच्या रॅलीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या सोबतचे भांडण मी सोडवायला तयार होत आहे. मी छोटी मोठी वाद महाराष्ट्राच्या हितासाठी विसरायला तयार आहे. मी सर्वांना मराठी माणसाच्या हितासाठी एकजूट होण्याची विनंती करीत आहे. उद्धव ठाकरे यांनी असे वक्तव्य करुन राज ठाकरे यांच्या प्रस्तावाला पोषक भूमिका घेतली आहे. परंतू राज ठाकरे यांनीही त्यांनी नंतर भाजपाची पोषक भूमिका घेऊ नये असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.