Raj Thackeray : “माझ्यासमोर राज ठाकरे उंदीर, त्यांनी रावणापेक्षाही जास्त अत्याचार केले” बृजभूषण सिंह यांचं पुन्हा कडवं आव्हान
आता बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढलाल आहे. राज ठाकरेंनी रावणापेक्षा जास्त अत्याचार केला आहे. ते मला आव्हान देत आहेत मात्र माझ्यासमोर ते उंदीर आहेत, असे म्हणत राज ठाकरेंना त्यांना पुन्हा आव्हान दिलंय.
अयोध्या : भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचा राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला (Ayodhya Visit) होणार विरोध सध्या देशभर गाजत आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही या भूमिकेवर बृजभूषण सिंह हे अजूनही ठाम आहेत. हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे, कारण याच वादावरून कांचनगिरी यांनी राज ठाकरेंची बाजू घेत थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. मात्र तरीही आता बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढलाल आहे. राज ठाकरेंनी रावणापेक्षा जास्त अत्याचार केला आहे. ते मला आव्हान देत आहेत मात्र माझ्यासमोर ते उंदीर आहेत, असे म्हणत राज ठाकरेंना त्यांना पुन्हा आव्हान दिलंय. तसेच आम्ही चांगले केले की वाईट. हे येणारी वेळ सांगेल, मला गर्व आहे, या लोकांनी मला निवडून कुस्तीचा हात माझ्या हातात दिला, तेव्हापासून 3 मेडल आलेत, असेही ते यावेळी म्हणाले.
फक्त राज ठाकरेंना जागा नाही
तसेच राज ठाकरे यांना आयोध्येला यायचं असेल तर त्यांनी अयोध्यात येण्याच्या आधी आदित्यनाथ यांना भेटायचं, असेही त्यांनी बजावलं आहे. तसेच एकदा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे कैद केलेलं. महाराजांना सन्मान नाही मिळाला नाही म्हणून ते निघाले तेव्हा त्यांना कैद केलं गेलं. तेव्हा युपीच्या लोकांनी सुटण्यासाठी मदत केली. संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले गेले. आमच्या काशीच्या संतांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली, असे सांगत मराठी माणूस आणि उत्तरप्रदेशच्या लोकांचे नाते कमजोर नाहीये, माझा महाराष्ट्राच्या लोकांना प्रणाम आहे, आम्ही सांगितले की महाराष्ट्रातील कोणी आले जर जागा नसेल तर आम्ही देऊ मात्र फक्त राज ठाकरे यांना जागा देणार नाही, असेही ते म्हणाले.
रावणापेक्षा जास्त अत्याचार केला
ठेलेवाला, ऑटोवाला, पाणीपुरीवाला, विद्यार्थी यांना राज ठाकरे यांनी मारले, त्यामुळे पाप करणाराच फक्त भागीदार नाही होता जो पाहतो तोही तेव्हडाच भागिदार असतो. राज ठाकरे यांनी केलेला अत्याचार तेवढा रावणाने केला नव्हता. त्यामुळे हे फक्त अभिमान आणि स्वाभिमानासाठी आहे. मी राज ठाकरे यांना फक्त माफी मागायला सांगितले आहे. मी बाकी काही मागितले आहे. ही त्यांची धार्मिक यात्रा नाही त्यांची राजनितिक यात्रा आहे. तसेच सगळ्या धर्माचा एकच सिद्धांत आहे ईश्वर एक आहे, ही माझी व्यक्तीगत लढाई नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तुम्ही उंदीर आहात
तसेच चला मोदींजींची माफी मागा, नंतर योगीजी मुख्यमंत्री आहेत तसेच ते योगीही आहेत. त्यामुळे मी ऑप्शन देत आहेत. मात्र ते चुनौती देत आहेत. पण जर माफी नाही मागितली तर दिल्ली , उत्तरप्रदेश काय आहे हे पाहू नाही शकणार, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मी असेल वा नसेल पण उत्तरप्रदेशवाले त्यांना माफ करणार नाही. राज ठाकरे दुनिया गोल आहे. काही लोक बोलतात मी आधी का नाही बोललो आता का? पम माझे काही मित्र आहेत यांना मी 2018 ला बोललेलो. राज ठाकरे जर मला भेटले असतात तर दोन हात केले असते. राज ठाकरे तुम्हा उंदीर आहात. भगवान राम यांचे दर्शन घेऊ इच्छिता तर त्यांचे गुण पण घ्या, तसेच मी जंगलात उभा राहिलो तर मागे दोन हजार लोक उभे राहतील, असा इशाराही पुन्हा बृजभूषण यांनी दिला आहे.