राज साहेबांचा फोन आला होतो, पण मी घेतला नाही, वसंत मोरे यांनी सांगितले कारण

Vasant More and Raj Thackeray | माझ्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी पक्षातील लोकांनी या विषयावर बोलू नये, असे आदेश दिले होते. परंतु त्यांचे पालन होत नाही. पक्षातील ती लोक रात्री तीन, तीन वाजता कार्यकर्त्यांना फोन करुन धमकवत आहेत. पोस्ट डिलिटी कर, असे सांगत आहे. पोस्ट का टाकली, त्याचा जाब विचारत आहे.

राज साहेबांचा फोन आला होतो, पण मी घेतला नाही, वसंत मोरे यांनी सांगितले कारण
vasant more and raj thackeray
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 11:44 AM

मनसेमधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे दुसऱ्या दिवशीही अस्वस्थ होते. आता त्यांना विविध पक्षांकडून फोन येत आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यांशी संपर्क साधला आहे. सर्वांकडून आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली जात आहे. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्याशी संपर्क केला का? मग राज ठाकरे वसंत मोरे यांना काय म्हणाले? या प्रश्नाची चर्चा सुरु झाली आहे. या प्रश्नावर वसंत मोरे यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांचा फोन आला होता, असे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना वसंत मोरे यांनी म्हटले.

राज ठाकरे यांचा आला होता फोन

वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती केली, कृपया मला फोन देऊ नका. मी त्यांना फसवू शकत नाही. आयुष्यात कधी त्यांना फसवले नाही. आता मला माघारी परत जायचेच नाही. मला आग्रह करु नका. साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला ते जमणार नाही. बोलायला जड होईल. कारण परवा माझी शुगर खूप वाढली होती. माझे काही बरे वाईट झाले तर कोणासाठी काय करायचे आहे, असे भावनिक होऊन वसंत मोरे यांनी सांगितले.

त्या लोकांचे उद्योग थांबले नाही

माझ्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी पक्षातील लोकांनी या विषयावर बोलू नये, असे आदेश दिले होते. परंतु त्यांचे पालन होत नाही. पक्षातील ती लोक रात्री तीन, तीन वाजता कार्यकर्त्यांना फोन करुन धमकवत आहेत. पोस्ट डिलिटी कर, असे सांगत आहे. पोस्ट का टाकली, त्याचा जाब विचारत आहे. हे प्रकार थांबले नाही तर मला साहेबांना सांगावे लागेल. साहेब तुम्हाला कोण फसवत होते, ती नावे जाहीर करावी लागतील.

हे सुद्धा वाचा

मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली

लोकसभेची नाही पण काँग्रेस पक्षात या म्हणून मोहन जोशी यांनी मला सांगितले. परंतु मी कुठल्याही ऑफरसाठी मनसे सोडलेली नाही. मी माझा निर्णय पुणेकरांशी बोलून घेणार आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.