पाकिस्तानचं पाणी अडवायला नदीत अमित शाह झोपणार का? : राज ठाकरे

कोल्हापूर : पाकिस्तानात जाणारं पाणी अडवून, पाकची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्री आणि नेत्यांनी म्हटले असताना, या वक्तव्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “नदीमध्ये बंधारा म्हणून अमित शाहांना बसवणार का?” अशा शब्दात राज ठाकरेंनी पाणी अडवण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे […]

पाकिस्तानचं पाणी अडवायला नदीत अमित शाह झोपणार का? : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

कोल्हापूर : पाकिस्तानात जाणारं पाणी अडवून, पाकची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्री आणि नेत्यांनी म्हटले असताना, या वक्तव्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “नदीमध्ये बंधारा म्हणून अमित शाहांना बसवणार का?” अशा शब्दात राज ठाकरेंनी पाणी अडवण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले?

“नदीमध्ये बंधारा म्हणून अमित शाहांना बसवणार का? अमित शाहा जारे जोप, अडेल पाणी आपोआप.”, असे म्हणत राज ठाकरे पुढे म्हणाले,”पाकिस्तानचं पाणी तोडणार. पाकिस्तानचं पाणी तोडयला, ते पाणी नळातून देता का? इंटरनॅशनल वॉटर अॅक्ट नावाची काही गोष्ट असते की नाही? दोन किंवा तीन देशातील जाणारं पाणी एक देश थांबवू शकतो का?”

तसेच, पुलवामा हल्ल्यातील 40 जवान शहीद झाले, हे जवान राजकीय बळी आहेत, असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला.

“अजित डोभाल या एका माणसाची कसून चौकशी झाली ना, तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील. हे नेमकं काय प्रकरण होतं आणि काय घडलंय, हे बाहेर येईल.”, असे म्हणत पुलवामा हल्ल्यावरुन राज ठाकरेंनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

“निवडणुकीच्या तोंडावर किंवा मध्यात अशीच कोणतीतरी घटना घडवली जाईल आणि तुमच्या सगळ्यांचं लक्ष हे त्या गोष्टीकडे वळवलं जाईल. चार वर्षातील भ्रष्टाचार वगैरे तुम्ही विसरून जाल. अशी कोणतीही गोष्ट हे घडवू शकतात. आपली स्मरणशक्ती कमी असते, त्यामुळे त्या गोष्टी घालवायच्या. हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान असे चित्र निर्माण केलं जाईल.”, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

VIDEO : राज ठाकरे यांचं कोल्हापुरातील संपूर्ण भाषण :

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.