राज ठाकरेंची तोफ मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बरसली

अमित ठाकरे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांना गळ घातली नसल्याचं राज ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसंच अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार, आणि भाजप-शिवसेना अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तर दिली आहेत.. पाहुयात

राज ठाकरेंची तोफ मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बरसली
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 10:56 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणांमध्ये उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन घेरत आहेत. अर्थात उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत त्यावर TV9च्या मुलाखतीत उत्तर दिलेलं आहे. आधी अडीच वर्षे भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता, त्यामुळं आपण बोललो नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण अडीच वर्षावरुन तरी मोदी आणि शाह जाहीर सभेत कुठं बोलले, असा प्रतिसवाल राज ठाकरेंनी केला आहे.

राज ठाकरेंची तोफ मुख्यमंत्री शिंदेंवरही जोरदार बरसतेय. त्यावरुन TV9चे संपादक उमेश कुमावतांनी राज ठाकरेंना मुलाखतीत हाच थेट प्रश्न विचारला. त्यावर मनसे अध्यक्षांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. माहिममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदेंनीही विद्यमान आमदार सदा सरवणकरांना मैदानात उतरवलं. त्यावरुन शिंदे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकही सुरु झाली. मात्र आपण अमित ठाकरेंसाठी उमेदवार मागे घ्या म्हणून गळ घातली नाही, असं सडेतोड उत्तर राज ठाकरेंनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी चर्चा न करताच माहिममध्ये उमेदवार दिल्याचं स्वत: मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यावर शिंदेंचीच पहिली निवडणूक आहे म्हणत, चर्चा काय करणार असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी मतदानाच्या आधीच आपण महायुतीसोबत जाणार असल्याचं सांगितलं. मग असं असतानाही ते शिंदेंवर टीका करतायत. त्यावरुनही राज ठाकरेंना सवाल केला.

महायुतीसोबत जाणार मग शिंदेंवर टीका का ? मुंबईत भाजपच्या बड्या नेत्यांविरोधात मनसेनं उमेदवार दिलेला नाही. पण शिंदेंच्या उमेदवारांच्या विरोधात मनसेनं आपले उमेदवार उभे केलेत. त्यामुळं छुपी युतीवरुनही टीका होतेय. पण ज्या ठिकाणाहून मागणी झाली नाही, तिथं उमेदवार दिलेला नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील टीका आणि भूमिका यावरुन अनेकांच्या मनात बरेच सवाल आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राज ठाकरेंनी TV9च्या मुलाखतीतून दिलं आहे.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.