राज ठाकरे यांचा शरद पवारांवर मोठा हल्ला, फोडाफोडीचे राजकारण अन् जातीचे राजकारण…

raj thackeray press conference: शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन करताना फोडाफोडी केली. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात राज्यात शरद पवार यांनी सुरु केले. तसेच जातीचे विष देखील त्यांनीच कालवले. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या जन्म झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण पाहा.

राज ठाकरे यांचा शरद पवारांवर मोठा हल्ला, फोडाफोडीचे राजकारण अन् जातीचे राजकारण...
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Aug 24, 2024 | 1:01 PM

राज्यातील फोडाफोडीचे आणि जातीपातीच्या राजकारणास शरद पवार जबाबदार आहे. त्यांनी त्याची सुरुवात केली, असा घाणाघाती हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. विदर्भातील दौऱ्यात बोलताना नागपूरमधून राज ठाकरे यांनी हे आरोप केले. राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन करताना फोडाफोडी केली. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात राज्यात शरद पवार यांनी सुरु केले. तसेच जातीचे विष देखील त्यांनीच कालवले. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या जन्म झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण पाहा. त्यापूर्वीच्या काळात कधी संत आणि कधी महापुरुषांची विभागणी झाली नव्हती. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच हा प्रकार सुरु झाला.

महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्राचा पुनरावृत्ती होत आहे. जाती वाद फोडफोडी सुरू झाली. शरद पवार यांनी त्याची सुरवात पुलोदपासून केली. फोडा फोडीचा राजकारण आणि जातीच राजकारण शरद पवार यांनी सुरू केले. संत महापुरुष जाती जातीत कधीच विभागले नव्हते ते 1999 पासून सुरू झाले. हा विषय सगळ्यांनी बंद केला पाहिजे.

लोकसभा निवडणुकीत मतदान असे…

लोकसभा निवडणुकीत आघाडी आणि महायुतीला झालेले मतदान आपण समजून घेतले पाहिजे. त्यावेळी भाजपच्या विरोधात मुस्लिम लोकांनी मतदान केले. संविधान बदलणार म्हणून भाजप विरोधात दलित समुदायाने मतदान केले. त्या काळात झालेले मतदान मोदी आणि शहा विरोधात झाले होते. ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या प्रेमासाठी मतदान नव्हते. गेल्या पाच वर्षांत या लोकांनी राज्यात जे गलिच्छ राजकारण केले, ते राजकारण महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने कधीही विचार केला नसेल की महाराष्ट्रात असे राजकारण चालणार आहे.

हे सुद्धा वाचा

लोक राज्यातील राजकारणास कंटाळले

मी यापूर्वी सांगितले होते निवडणुकीच्या आधी हाणामाऱ्या सुरू होतील, त्याची झलक आपण लोकसभेत काहीशी पहिली आता पुन्हा दिसेल. आमच्यासाठी वातावरण पोषक आहे. लोक राजकारणाला कंटाळले आहे. दिवाळी नंतर विधानसभा निवडणूक लागतील असे वाटत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

हे ही वाचा…

लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांचे पहिल्यांदा थेट भाष्य, ही योजना म्हणजे…

Non Stop LIVE Update
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.