लाजीरवाणी गोष्ट म्हणजे यांनी बाळासाहेबांच्या पुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत आज पहिली सभा घेतली. पहिल्याच सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी खालच्या स्तरावर जाऊन बाळासाहेबांच्या नावापुढे लागलेलं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं.

लाजीरवाणी गोष्ट म्हणजे यांनी बाळासाहेबांच्या पुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं - राज ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 7:52 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीत पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. राज ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नावापुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकल्याची टीका केली. काही ठिकाणी बाळासाहेबांच्या नावापुढे जनाब लावल्याने देखील राज ठाकरे यांनी टीका केली. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

राज ठाकरे म्हणाले की, ‘वेगळ्या विचारांची युती आणि आघाडी होती. पण सर्वात लाजीरवाणी गोष्ट उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानंतर बाळासाहेबांच्या पुढचं हिंदुहृदयसम्राट काढून टाकलं. काही ठिकाणी तर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलेलं मी पाहिलं. स्वत:च्या स्वार्थासाठी इतक्या खालपर्यंत गेले तुम्ही. सभापतींना तेव्हा सांगितलं होतं बाळासाहेबांचं एक चित्र विधानभवन आणि विधानपरिषदेच्या सभागृहात लावा. त्यांना कळेल आपण इथपर्यंत कोणामुळे आलो. हे इकडे बघत होते तिकडे ४० निघून गेले. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही आपले ४० आमदार गेले. हे आमदार घेऊन जाणारे एकनाथ शिंदे म्हणाले होते, काँग्रेस आणि अजित पवार यांच्यासोबत बसणं म्हणजे श्वास घेता येईना. पण नंतर अचानक कळलं मांडीवर अजित पवार येऊन बसले. कोणतं राजकारण सुरु आहे. काय चालुये. महाराष्ट्राचं भविष्य हे आहे का?’

‘शेतकरी आत्महत्या करतोय. यांची मात्र मज्जा सुरु आहे. हे माणसं असे का वागतात कारण तुम्ही चिडत नाहीत. याच लोकांना पुन्हा मतदान करतात म्हणून तुम्हाला गृहीत धरले आहे. कसेही वागले तरी चालेल. परत रांगेत उभे राहतील आणि आम्हालाच मतदान करतील. ही समज तुम्ही मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्र ठिकाण्यावर येणार नाही. असा महाराष्ट्र कधी नव्हता.’

‘गद्दारी करणारे आधी मान खाली घालून जायचे. आता मात्र त्यांना काहीच वाटत नाही. मतांचा अपमान करुन देखील तुम्ही शांत बसत असेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला. शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरु केले. आता तर पक्ष आणि चिन्हच ताब्यात घ्यायचं. असं कधी पाहिलं नव्हतं. शिंदे आणि पवारांनी नाव आणि चिन्ह घेतलं. शिवसेना नाव हे उद्धव ठाकरे किंवा शिंदेची प्रॉपर्टी नाही. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माणसं पळवली जाताय.’ असं ही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.