Video : राज्यपालांना शिवराय कळलेत का? राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

त्यांनी राज्यपालांनाही (Governor Bhagat Singh Koshyari)  सोडलं नाही. राज्यपालांची नक्कल करत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chatrapati Shivaji mahraj) राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचार राज ठाकरेंनी समाचार घेतला आहे.

Video : राज्यपालांना शिवराय कळलेत का? राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार
राज ठाकरेंकडून मोठी तयारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 8:13 PM

पुणे : आज मनसेला 16 सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी (Raj thackeray Speech) तब्बल दोन वर्षांनंतर त्यांच्या खास शैलीत धडाडीने भाषण केलं. त्यावेळी त्यांनी नेत्यांचा तर समाचार घेतलाच, मात्र यावेळी त्यांनी राज्यपालांनाही (Governor Bhagat Singh Koshyari)  सोडलं नाही. राज्यपालांची नक्कल करत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chatrapati Shivaji mahraj) राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचार राज ठाकरेंनी समाचार घेतला आहे. हे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष तुम्हाला जातीत गुंतवून ठेवत आहेत. शिवाजी असं नुसतं नाव ऐकू आलं की हा माणूस उठून जायचा, काहीतरी सापडेल या आशेने, असे म्हणत हे परवा आमचे राज्यपाल. काहीसमज बिमज आहे का ? मी जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो, बघितलं ना कसंय ते? असे म्हणत थोड मागे झुकत, वाकडं होत राज ठाकरेंनी राज्यपालांची हुबेहुब नक्कल केली. त्यानंतर त्याच शैलीत राज्यपालांचा समाचार घेतला आहे.

राज्यपाल काहीही बरळतात

राज्यपालांशी पहिल्या भेटीबाबत सांगताना राज ठाकरे म्हणाले, पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो तेव्हा वाटलं की माझा हात बघायला लागतील की आप का मंगल कहा पै है..? तुम्हाला काही माहितीये का? महापुरुषांबद्दल माहितीये का? आपला अभ्यास, संबंध नसताना नुसतं बोलून जायचं. रामदास स्वामींनी काय लिहीलेय, छत्रपतींनी काय लिहीलंय ते माझ्या घरात लावलंय मी. शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. वाचा ते निश्चयाचा महामेरू…कोण श्रीमंतयोगी…असे म्हणत त्यांनी राज्यपालांचा समाचार घेतालाय. तसेच आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली ना ईडीची की कळतं श्रीमंतय, अशी कोपरखिळीही त्यांनी मारली आहे.

निवडणुकांसाठी राजकारण सुरू

आमच्याच महापुरुषांना बदनाम करायचं आणि माती फिरवून मतं मिळवायची. एवढाच उद्योग सुरु आहे. परवादिवशी भाषणात कुणीतरी मला दाखवलं, जोतिबा आणि सावित्राबाईंबद्दल बोलतो, नक्कल करुन दाखवतो. अहो तेव्हा व्हायची लग्न.. तुमचं अजून नाही झालं. सालं नको तिथं बोटं घालायची सवय यांना, असे म्हणत राज्यपालांच्या त्याही वक्तव्याचा समाचार घेतला आहे. यानंतर कोंबड्या लागल्या झुंजायला, मग आता दोन दिवसांनंतर कळलं, निवडणुका होत नाही, मग सगळे पुन्हा शांत, असे म्हणत त्यांनी राजकीय पक्षांचाही समाचार घेतला आहे. तसेच निवडणुका लांबणीवर पडणार हे नोव्हेंबरपासून सांगत होतो. मला वाटत नाही निवडणुका मार्चमध्ये होतील. मी काही पत्रकारांशीही बोललो होतो, निवडणूक आली ना की ती चढायला लागते. आता बरोबर कळला तुम्हाला निवडणुकीचा अर्थ, साला चढायला लागते म्हणजे काय? तर अशी ती स्पर्श करते. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला वातावरणात निवडणूकच दिसेना, असेही ते म्हणाले आहेत.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.