Raj Thackeray Uttar Sabha : भोंगे ते हिंदुत्व, राज ठाकरे यांची उत्तरसभा कोणत्या 5 मुद्द्यांवर होणार?

Raj Thackeray Uttar Sabha Thane LIVE Updates | राज ठाकरे काय बोलणार, याचा अंदाज वर्तवणे तसे म्हटले तर अवघड आणि तसे म्हटले तर सोपे. त्यांनी घेतलेली भूमिका पाहता ते पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका कशी योग्य, यावर बोलू शकतील. शिवाय मराठीचा मुद्दा आहेच. त्यांच्या बदललेल्या भूमिकेवर कोण-कोण टीका केली, याचाही ते समाचार घेऊ शकतात.

Raj Thackeray Uttar Sabha : भोंगे ते हिंदुत्व, राज ठाकरे यांची उत्तरसभा कोणत्या 5 मुद्द्यांवर होणार?
राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 6:45 PM

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष आणि आता कडव्या हिंदुत्वाची शाल अंगावर घेतलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज सायंकाळी ठाण्यात होणारी सभा कोणत्या मुद्यांनी गाजणार याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. पाडव्यादिवशी शिवतीर्थावर झालेल्या सभेत राज यांनी उपस्थित केलेल्या भोंग्याच्या मुद्यावरून राज्यातले राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्या मुद्याला रसद पुरवण्याचे काम भाजपकडून सुरू असून, मोहित कंबोज यांनी चक्क दहा हजार भोंग्यांची ऑर्डर दिल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा वाजवून सभेच्या आदीच फटाके फोडलेत. राज यांच्या बदलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदींनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केलीय. या साऱ्यांना राज आज काय उत्तर देणार, हे पाहावे लागेल.

राज काय बोलणार?

राज ठाकरे काय बोलणार, याचा अंदाज वर्तवणे तसे म्हटले तर अवघड आणि तसे म्हटले तर सोपे. त्यांनी घेतलेली भूमिका पाहता ते पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका कशी योग्य, यावर बोलू शकतील. शिवाय मराठीचा मुद्दा आहेच. त्यांच्या बदललेल्या भूमिकेवर कोण-कोण टीका केली, याचाही ते समाचार घेऊ शकतात. राज यांचे कार्यकर्ते या सभेतून बेगडी हिंदुत्व, सामान्य माणसाची फसवणूक, महाराष्ट्राला लुबाडणारे लुटारू, स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या प्रवृत्ती या साऱ्यांना उत्तर मिळेल, असा दावा करत आहेत. त्यामुळेच ते या सभेला सोशल मीडियावर उत्तरसभा म्हणत आहेत.

युतीच्या चर्चेचे वारे

येणाऱ्या काळात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबादसह एकूण अठरा महापालिकेच्या निवडणुका होतायत. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेने सर्वस्व पणाला लावले आहे. दुसरीकडे भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू झालीय. त्या पार्श्वभूमीला राज यांच्या बदलेल्या भूमिकेने आणखीच उजाळा दिलाय. राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो म्हणतात. हेच राज यांनी भाजपचे कौतुक करून दाखवून दिलेय. त्यामुळे मनसे आणि भाजप युती होणार का, याचीही चर्चा रंगताना दिसतेय.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray Speech LIVE : राज ठाकरेंचं वादळी भाषण Live, आज इतर पक्षांचे “भोंगे” बंद होतील-मनसे

Raj Thackrey Speech : ‘राष्ट्रवादीनं दुसऱ्या जातीचा द्वेष करायला लावला’, राज ठाकरेंचा शरद पवारांवर पुन्हा थेट आरोप

Raj Thackeray LIVE Speech : तीन नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि दोन नंबरच्या भाजप शिवसेनेला फिरवत होता : राज ठाकरे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.