राज ठाकरेंचं श्वान प्रेम पुन्हा चर्चेत, नव्या घरातील लाडक्या कुत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल
राज ठाकरे हे श्वान प्रेमी असून, त्यांच्या घरात अनेक प्रजातीचे कुत्रे आहेत. विशेष म्हणजे या श्वानांबरोबरच त्यांच्याकडे तीन पग जातीचे कुत्रे आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा असलेला जेम्सही तर सर्वांच्याच ओळखीचा होता. अनेक वर्षांपासून तो राज ठाकरेंसोबत राहत होता. परंतु वयोमानानुसार गेल्या काही दिवसांपूर्वी जेम्सने निधन झाले होते.
मुंबईः गेल्या काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी नव्या घरात प्रवेश केलाय. तेव्हापासून राज ठाकरेंच्या घराचं अनेकांना कुतूहल आहे, पण या नव्या घरातील राज ठाकरेंच्या कुटुंबातील सदस्य असलेले श्वानही नेहमीच चर्चेत असतात. राज ठाकरेंचं श्वान प्रेम तर जगजाहीर आहे. आता नव्या घरातही राज ठाकरेंच्या श्वानांची चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे नवीन घरात आपल्या लाडक्या श्वानांसोबत मज्जा करतानाचाही एक फोटो व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनाही तो फोटो तुफान आवडलाय. राज ठाकरे आणि अमित ठाकरेंसोबत फोटोत दिसत असलेल्या श्वानांची नावं मुफासा आणि ब्लू अशी आहेत.
राज ठाकरेंच्या घरात अनेक प्रजातीचे कुत्रे
राज ठाकरे हे श्वान प्रेमी असून, त्यांच्या घरात अनेक प्रजातीचे कुत्रे आहेत. विशेष म्हणजे या श्वानांबरोबरच त्यांच्याकडे तीन पग जातीचे कुत्रे आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा असलेला जेम्सही तर सर्वांच्याच ओळखीचा होता. अनेक वर्षांपासून तो राज ठाकरेंसोबत राहत होता. परंतु वयोमानानुसार गेल्या काही दिवसांपूर्वी जेम्सने निधन झाले होते. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला होता. राज ठाकरेंच्या घराचं रक्षण कन्या ही कुत्री करते. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मुफासा (गोल्डन रिस्टरिव्हर) आणि ब्ल्यू (हस्की) हे कुत्रे आहेत.
त्यांच्या गाडीत कुत्र्यांसाठी बिकिस्टांचा साठा तयारच
राज ठाकरेंना रस्त्यावर एखादा भटका कुत्रा दिसला तरी राज त्याला बिस्किट खाऊ घालतात. तसेच त्यांच्या कुत्र्यांना ते शिवाजी पार्कातही फिरवताना दिसतात. त्यांच्या गाडीत कुत्र्यांसाठी बिकिस्टांचा साठा तयारच ठेवलेलाच असतो. आपल्या पाळीव कुत्र्यांची ते विशेष काळजी घेतात. कुटुंबातील एखाद्या सदस्यासारखी ते आपल्या पाळीव कुत्र्यांची काळजी घेतता. विशेष म्हणजे ते त्यांचे वाढदिवसही साजरे करतात. घरी पाहुणे येवो अथवा कार्यकर्ते त्यांची ओळख ते आपल्या कुत्र्यांसोबत नेहमीच करून देतात.
संबंधित बातम्या
VIDEO: संजय राऊतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट; कन्येच्या लग्नाचं दिलं निमंत्रण
राज ठाकरे करणार नव्या घरात प्रवेश; ‘असे’ असेल नवे निवासस्थान