सध्या काही डबे जोडण्याचं काम सुरुय; नागपूर दौऱ्याविषयी राज ठाकरेंनी केलं सूचक वक्तव्य
आपले राजकीय मुद्दे गुलदस्त्यात ठेवून पत्रकारांबरोबर संवाद साधला. सध्या मनपा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने मनसेची आपल्याला कुठे कुठे मदत मिळणार यासाठीही भाजप आणि शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचे सगळ्यानाच वेध लागले आहेत. त्यामुळे राज ठाकरेही सध्या शिंदे गट, भाजपबरोबर चाचपणी करु लागले आहेत. बांद्रा येथे आले असता त्यांना तुम्ही रेल्वेने नागपूरला का जात आहाते असा सवाल उपस्थित केल्यानंतर त्यांनी सांगितले की, सध्या काही डबे जोडण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे मी रेल्वेनेच नागपूरला जात असल्याचे त्यांनी सांगितेल. राज ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याविषयी बोलताना मात्र त्यांनी आपले राजकीय मुद्दे गुलदस्त्यात ठेवून पत्रकारांबरोबर संवाद साधला. सध्या मनपा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने मनसेची आपल्याला कुठे कुठे मदत मिळणार यासाठीही भाजप आणि शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.