राज ठाकरे म्हणाले माझा ‘तो’ व्हिडिओ बघाच, काय आहे तो व्हिडिओ पाहा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिंडोशीमध्ये आज सभा घेतली. या सभेत त्यांनी एक व्हिडिओ पाहण्याच आवाहन सर्व मतदारांना केलं. हा व्हिडिओ १० वर्षापूर्वी अपलोड करण्यात आलेला आहे. पण खूप कमी लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. काय आहे राज ठाकरे यांचा तो व्हिडिओ जाणून घ्या.

राज ठाकरे म्हणाले माझा 'तो' व्हिडिओ बघाच, काय आहे तो व्हिडिओ पाहा
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 8:44 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिंडोशीमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेकांवर टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, ‘काही नेत्यांकडे हजारो एकर जमिनी आहेत. किती हावरटपणा करावा. ज्यांना तुम्ही मतदान करता त्या लोकांना या प्रश्नाचे भान नाही. आजही अनेक वर्षांपासून त्याच प्रश्नावर बोलतोय. मुलभूत गरजांच्या पलीकडे जाणार नाही तर नवीन काही शोध लागूच शकत नाही. आमच्याकडे गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाणारे लोकं कोण तर मिशा वाढवलेले आणि नखं वाढवलेले. सकाळी उठल्यानंतर सकाळी गाडी कशी पकडायची, शाळेत प्रवेश मिळत नाही, कोरोना काळात ऑक्सिजन मिळत नव्हते. झालेल्या गोष्टी आपण विसरुन जातो. राजकारण्यांनी काय माती केलीये हे मतदार विसरुन जातात. गेल्या पाच वर्षात मतदारांचा अपमान झालाय.’

‘ज्यांच्याविरोधात एका पक्षाची हयात गेली ती शिवसेना काँग्रेससोबत सत्तेत जाऊन बसली. आज बाळासाहेब असते तर काय वाटलं असतं त्यांना. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे दुकान काँग्रेसच्या दुकानाच्या बाजुला लावलं. स्वताच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार विसरले. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले.’

‘माझी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत स्वप्न आहेत. आज घरी गेल्यावर राज ठाकरे Aesthetic जाऊन युट्युबवर सर्च करा. तुम्हाला माझं व्हिजन कळेल. नाशिक शहरात काय काय केलं एकदा जाऊन बघा. फक्त पाच वर्षात केलंय.’

‘यांच्या हातात ३०-४० वर्ष सत्ता आहे. पण प्रश्न संपायच्या ऐवजी वाढत आहेत. आयुष्यातील ५-५ वर्ष जात आहेत. माझा पूर्नजन्मावर विश्वास नाही. जे आहे ते हेच आयुष्य. कशासाठी मतदान करताय. तुम्हाला पर्याय मी देतोय. तुमच्यासमोर राज ठाकरे पर्याय म्हणून उभा आहे. झाले ते चांगलेच होणार आहे. माझे स्वप्न प्रामाणिक आहे.’

‘राष्ट्रवादीचा एक नेता बाळासाहेबांचं नाव घेत नाही. उद्धव ठाकरे काँग्रेसचा प्रचार करताय. बाळासाहेबांच्या प्रतीचं प्रेम आणि आदर मला कोणी शिकवू नये. फक्त फोटो दाखवून स्वताचे स्वार्थ साध्य करताय. निवडणुका झाल्यानंतर सगळ्या उमेदवारांना एक फोन देणार आहे. लोकांचे फोन घेण्यासाठी ते उपलब्ध असतील. इतर सर्व नादान लोकांना तुम्ही अद्दल घडवा.’

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.