Raj Thackeray : राज ठाकरेंचा तीन पानी आदेश पण नेमकं ‘बोल्ड’ काय केलंय, त्याचा अर्थ काय?

राज ठाकरे हे मशीदीवरील भोंगे हटवण्यावर ठाम राहिले आहे. आणि त्यांनी तसे आदेश मनसैनिकांसाठी काढले आहे. मात्र या पत्रात राज ठाकरेंनी काही मजकूर बोल्ड केला आहे. त्या मजकुराचीही सध्या जोरदार चर्चा आहे. हा जणू पुन्हा दिलेला सज्जड दम वाटतोय.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा तीन पानी आदेश पण नेमकं 'बोल्ड' काय केलंय, त्याचा अर्थ काय?
मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिासांचा इशाराImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 9:11 PM

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) नावाच्या रसायनाने सध्या राज्याचे राजकारण ढवळून काढलं आहे. औरंगाबादेतल्या सभेतून त्यांनी पुन्हा भोंग्याबाबत (Msjid Loudspeaker) इशारा देत सरकारचं टेन्शन वाढवलं. त्यानंतर मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी पोलिसांनी धरपकड सुरू केली. हजारो मनसैनिकांना नोटीसा बजावल्या. मात्र तरीही राज ठाकरे यांनी जराही नमतापणा किंवा चर्चेचा मार्ग स्वीकारला नाही. कारण आज राज ठाकरेंनी भलं मोठं तीन पानांचं पत्र काढत मनसैनिकांसाठी आदेश काढला आहे. त्यांनी कालच भोंग्याबाबत पुढे काय करायचं हे मी उद्या ट्विटरद्वारे मांडेन असे सांगितले आणि आज ट्विटरद्वारे पुन्हा मोठं राजकीय वादळ उठवलं, कारण राज ठाकरे हे मशीदीवरील भोंगे हटवण्यावर ठाम राहिले आहे. आणि त्यांनी तसे आदेश मनसैनिकांसाठी काढले आहे. मात्र या पत्रात राज ठाकरेंनी काही मजकूर बोल्ड केला आहे. त्या मजकुराचीही सध्या जोरदार चर्चा आहे. हा जणू पुन्हा दिलेला सज्जड दम वाटतोय.

राज ठाकरेंच्या पत्रातील बोल्ड मजकूर

देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे.

सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंग बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.

माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारुन एकत्र या.

आता नाही, तर कधीच नाही

याचा नेमका अर्थ काय?

राज ठाकरेंनी हा भक्त मनसैनिकांना दिलेला संदेश नाही तर अनेकांना दिलेला हा कडकडीत इशारा आहे. हा इशारा देशभरातील राजकारण सध्या हादरवून सोडत आहे. काही दिवसातच राज्यात महापालिकांच्या आणि इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात लागत आहे. त्या सगळ्यावर याचा किती परिणाम होते हे येणारा काळच सांगेल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.