माझ्या हातात सरकार द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो; राज ठाकरे कडाडले

MNS Vardhapan Din and Raj Thackeray: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पत्रकार नव्हते. हे बरे झाले. नाहीतर पत्रकार परिषदेत विचारलं असतं, महाराज तो गनिमी कावा सांगता का काय असतो तो? अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी पत्रकारांवर केली.

माझ्या हातात सरकार द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो; राज ठाकरे कडाडले
राज ठाकरे, नाशिक
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 1:32 PM

चंदन पुजाधिकारी, नाशिक | दि. 9 मार्च 2024 : आपले विरोधक हे पत्रकारितेतही आहेत. ते सर्व गोष्टी पसवरतात. ते सुरुवात करतात. शेवट करत नाही. आम्ही सुरुवात करतो शेवट करत नाही? एक आंदोलन दाखवा. त्याचा शेवट नाही केला? बाकीच्यांना प्रश्न विचारत नाही. मागच्या सरकारने एक विषय पुढे ढकलला होता. त्याचं काय झालं. अरबी समुद्रात शिवस्मारक का नाही झालं? पंतप्रधान आले फुलं वाहून गेले. त्या फुलांचं काय झालं. अनेक गोष्टी आहेत. मनसेने जेवढी आंदोलने केली त्याचा शेवट केला. टोलनाके बंद झाले. मी पहिल्यापासून सांगत होतो, आपली भूमिका स्वच्छ होती. टोल तर जगभर चालतात. आमचं म्हणणं होतं टोलमधून पैसे येतात ते कुठून येतात आणि जातात कुठे? रस्ते नीट करता येत नाही आणि टोल वसूल करताय? मराठी पाट्या झाल्या. अनेक प्रार्थना स्थळावरचे भोंगे काढायचे म्हटलं बंद झाले भोंगे बंद झाले, अशी अनेक उदाहरणे मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या आंदोलनाची दिली. नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांचे सरकार कसे हिंदुत्ववादी

उद्धव ठाकरे यांचे सरकार हे डरपोक सरकार होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आम्ही भोंग्यावर बोललो. त्यांनी १७ हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. हे म्हणे हिंदुत्ववादी. या भोंग्यांचा मुस्लिमांना त्रास होतो. काल मुस्लिम मोहल्ल्यात गेलो होतो. आंदोलन झाल्यावर भोंगे बंद झालं. पण सरकारच ढिल्लं पडलं. एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो. बघू कुणात हिंमत आहे पुन्हा भोंगा लावण्याची. माझ्या हातात सरकार द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो, असे राज ठाकरे कडाडले.

अन्यथा महाराजांना विचारलं असतं

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पत्रकार नव्हते. हे बरे झाले. नाहीतर पत्रकार परिषदेत विचारलं असतं, महाराज तो गनिमी कावा सांगता का काय असतो तो? त्या दिवशी मी आलो, पत्रकार परिषद घेतली. एकाने मला प्रश्न विचारला. मोदी महाराष्ट्रात फिरतात, सभा घेत आहे, तुम्हाला वाटतं ते लोकसभेसाठी घेत असतील. म्हटलं, माझ्या लक्षातच आलं नाही, ते लोकसभेसाठी येत असतील. विलक्षण आहे. तू माझे डोळेच उघडले असं मी त्यांना सांगितलं. हा काय प्रश्न आहे? अशी टीका राज ठाकरे यांनी पत्रकारांवर केली.

हे सुद्धा वाचा

हे ही वाचा

राष्ट्रवादीला पक्षच मानत नाही, शरद पवार नेहमी… राज ठाकरे यांची टीका काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.