राज ठाकरे करणार नव्या घरात प्रवेश; ‘असे’ असेल नवे निवासस्थान

 राज ठाकरे हे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर लवकरच नव्या घरात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज यांचे नवे घर दादर येथील त्यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज' शेजारीच आहे.

राज ठाकरे करणार नव्या घरात प्रवेश; 'असे' असेल नवे निवासस्थान
raj thackeray
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 6:10 PM

मुंबई – राज ठाकरे हे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर लवकरच नव्या घरात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज यांचे नवे घर दादर येथील त्यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ शेजारीच आहे. ‘कृष्णकुंज’ शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. या नव्या निवासस्थानी राज ठाकरे लवकरच आपल्या कुटुंबासह प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी सध्या जय्यत तयारी सुरू असून, राज ठाकरे या इमारतीला काय नाव देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही नवी इमारत सर्व सुविधांनीयुक्त असून, राज ठाकरे लवकरच आपल्या कुटुंबासह या इमारतीमध्ये राहाण्यासाठी जाणार आहेत.

निवासस्थानामध्ये भव्य ग्रंथालय

‘कृष्णकुंज’शेजारी बांधण्यात आलेल्या या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे. याच ठिकाणी राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, तसेच इतर नागरिकांना देखील याच कार्यालयात राज ठाकरे यांची भेट घेता येणार आहे. इतर मजल्यावर ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे. इमारतीचे काम पूर्ण झाले असून, आता दिवळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे आणि कुटुंबीय लवकरच या नव्या घरात गृहप्रवेश करणार आहेत.

कृष्णकुंज महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र

दरम्यान आतापर्यंत कृष्णकुंज हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. ही वास्तू अनेक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयाची साक्षीदार राहिली आहे. मुंबईसह राज्यातील कामगारांना् कोणतीही समस्या असो, त्यांना कृष्णकुंज हे आपल्या हक्काचे ठिकाण  वाटते. समस्या घेऊन कष्णकुंजवर आलेल्या नागरिकांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न मनसेच्या वतीने करण्यात आला. राजकीय वर्तृळामध्ये कृष्णकुंजला विशेष महत्त्व आहे. आता राज ठाकरे यांनी नव्या घरात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्याची अशीच वर्दळ ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी पाहायला मिळणार आहे.

tv9marathi.com/maharashtra/mumbai/shivsena-sanjay-raut-slam-bjp-through-saamana-editorial-over-bypoll-election-571568.html @rautsanjay61

@BJP4India #BypollResults2021

संबंधित बातम्या 

शिवसेनेच्या वाघिणीचं जंगी स्वागत, रश्मी ठाकरेंकडून डेलकरांचं औक्षण, मातोश्रीचा खास पाहुणचार

महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचा पहिल्यांदाच भगवा फडकवला, आता कलाबेन डेलकर म्हणतात….

दादरा नगर-हवेलीतून शिवसेनेचं सीमोल्लंघन, आता अन्य राज्यातही निवडणूक लढवणार? आदित्य ठाकरेंना सांगितला प्लॅन

रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.