Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील नव्या शिलेदारांना मिळणार राज ठाकरेंचा कानमंत्र

येत्या शुक्रवारी राज ठाकरे या नव्य शिलेदारांशी संवाद साधणार आहेत. या सर्वांना राज यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाईल. | Raj Thackeray MNS Pune

पुण्यातील नव्या शिलेदारांना मिळणार राज ठाकरेंचा कानमंत्र
राज ठाकरे, मनसेप्रमुख
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 7:39 AM

पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शहराच्या कारभारात विशेष लक्ष घालायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्याकडून पुण्याच्या (Pune) शहराध्यक्षपदी डॅशिंग नेते वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापाठोपाठ पुण्यातील मनसेची कार्यकारिणीही बदलण्यात आली होती. या नव्या कार्यकारिणीतील शिलेदारांना आता राज ठाकरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. (Raj Thackeray will meet Pune party workers)

येत्या शुक्रवारी राज ठाकरे या नव्य शिलेदारांशी संवाद साधणार आहेत. या सर्वांना राज यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाईल. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने यावेळी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राज ठाकरे आपल्या नव्या मावळ्यांना काय आदेश देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

डॅशिंग वसंत मोरेंना शहराध्यक्षपद

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेले वसंत मोरे हे आक्रमक नेतृत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे केली होती. याच कामगिरीमुळे वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आल्याचे समजते.

मी तुम्हाला कधीच विसरणार नाही: राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 15 व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एक ऑडिओ संदेश पाठवला होता. यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. अनेक पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या मनसैनिकांचे राज ठाकरे यांनी आभार मानले. ‘मी तुम्हाला कधीही विसरणार नाही,’ असा शब्दही राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

काही जण सोडून गेले, जाऊ द्यात. पण माझ्यासोबत सह्याद्रीच्या कड्यासारखे टिकून आहेत, त्यांना मी कधीही विसरणार नाही. पक्षाला जे जे यश मिळेल, त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र तुमच्याच हातून घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

“योग्य वेळी दांडक्याला हात घातला” पुणे पालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या मनसे नगरसेवकाचा नवा किस्सा

(Raj Thackeray will meet Pune party workers)

दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.