राज ठाकरे यांची मोठी भविष्यवाणी, शिंदे-दादांना धाकधूक

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीआधी मोठी भविष्यवाणी केली आहे. राज ठाकरे यांच्या भविष्यवाणीमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची धाकधुक वाढली आहे. काय आहे कारण जाणून घ्या.

राज ठाकरे यांची मोठी भविष्यवाणी, शिंदे-दादांना धाकधूक
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 1:48 AM

निवडणूक निकालानंतर विजयाचा दावा करत मनसे भाजपसोबत सत्तेत जाण्याचा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. त्यामुळे आता मनसेनं भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेविरोधात  उमेदवार दिलेले असले तरी आपण निकालानंतर भाजपसोबत सत्तेत असू किंवा आमच्या साथीनंच भाजपचा मुख्यमंत्री बनेल. असं राज ठाकरेंनी म्हटलंय. मनसे सत्तेत राहणार हे राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून ठामपणे सांगतायत. दुसरीकडे त्यांचे पुत्र अमित ठाकरेंनी मात्र मनसेच्या 100 जागा निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केलाय. यानंतर मनसे-भाजपची युती होवून शिंदे आणि अजितदादा गटाचं भविष्य अंधातंरी राहिल याकडेही त्यांनी बोट दाखवलंय.

मागच्या काही सभांमधून राज ठाकरे भाजपवर का टीका करत नव्हते, त्याचंही उत्तर आजच्या मनसेच्या भूमिकेतून मिळालंय. शिवसेनेनंतर भाजपशी सर्वाधिक संबंध आल्याचं म्हणत राज ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. राज ठाकरे म्हणाले की., महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाहीत. शिवसेनेत असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपशीच आला. सरकार महायुतीचं बनणार, 3 महिन्यापूर्वी मविआचं सरकार येणार असं वाटत होतं. पण हरियाणाच्या निकालानंतर थोडं चित्र बदललं आहे, मात्र महायुतीला इतकं सोपंही नाही.

मुख्यमंत्री भाजपचा होईल, आणि मनसे सत्तेत असेल. भाजपचा मुख्यमंत्री मनसेच्या साथीनं होईल. महाराष्ट्रातल्या राजकीय चिखलाला शरद पवार जबाबदार आहेत. लोकसभेत शिंदेंनी मनसेला धनुष्यबाणावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी शिंदेंसारखा पक्ष किंवा चिन्ह ढापलेला नाही, त्यामुळे नकार दिला. फोडाफोडी करुन सत्तेत जाणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवायला हवा.

एकीकडे राज ठाकरे पक्ष फोडाफोडी करुन सत्तेत जाणाऱ्यांना धडा शिकवण्याचं आवाहन करतायत., पक्ष फोडाफोडीवरुन विरोधक भाजपवर आरोप करत असताना राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे मात्र शिवसेना फुटीमागे भाजपचा जबाबदार मानत नाहीत. उलट भाजप आणि भाजपातले अनेक नेते हे नैतिकता पाळणारे असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपसोबत सत्तेत जाण्याचा दावा करणाऱ्या मनसेनंच भाजपच्या अनेक धोरणांवर आसूड का ओढले, या प्रश्नावर लोकांनी मनसेला स्वबळावर सत्ता द्यावी., असं अमित ठाकरे म्हणतात.

मनसेच्या या भू्मिकेनंतर काही महत्वाचे प्रश्नही विचारले जातायत. ते म्हणजे 2019 निवडणुकीआधी एकमेकांविरोधात लढून नंतर एकत्र आलेल्यांना राज ठाकरे राजकारणाचा चिखल म्हणतात. पण आता मनसेनं स्वतः भाजपविरोधातही अनेक उमेदवार दिले आहेत., आणि त्यांच्या दाव्यानुसार निकालानंतर मनसेच्या मदतीनं भाजप सत्तेत असणाराय. अर्ज भरताना अमित ठाकरेंनी राजकीय चिखलावरुन महायुतीसह-मविआविरोधात मनसेला कौल देण्याचं आवाहन करत मनसे स्वबळावर सत्तेत येण्याचा दावा केला होता., आता त्याच अमित ठाकरेंनी भाजपसोबत सत्तेचा विश्वास व्यक्त केलाय.

पुण्यात हिंदू महासभेच्या आनंद दवेंनी कसबा मतदारसंघात भाजपविरोधात मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी केली होती., पण आता मनसेनंच निकालानंतर भाजपसोबत सत्तेचा विश्वास व्यक्त केल्यानंतर राजसाहेब म्हणतील तीच भूमिका असं म्हणत त्यांचाही भाजपविरोध मावळलाय.

तूर्तास दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारत अमित ठाकरेंनी गेल्या काही काळात आलेल्या कटू अनुभवही पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितल्यात.

CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?.
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.