राज ठाकरे यांना टाडा, पोटा, रासुका लावा, प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी; ‘त्या’ विधानाचा समाचार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा लावून धरला आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांचं विधान समाज आणि देश दुभंगणारं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच राज ठाकरे यांना तुरुंगात टाकलं पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

राज ठाकरे यांना टाडा, पोटा, रासुका लावा, प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी; 'त्या' विधानाचा समाचार
राज ठाकरे यांच्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 1:06 PM

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढत आहे. सात ते आठ महापालिका निर्माण होतील एवढी लोकसंख्या ठाण्यात वाढत आहे. त्यामुळे आपला पैसा इतरांवर खर्च होत आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या विधानाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे यांची ही मागणी समाज दुभंगणारी आहे. देशविरोधी आहे. त्यामुळे त्यांना थेट टाडा, पोटा आणि नॅशनल सेक्युरिटी ॲक्ट (रासुका) लावून आत टाकलं पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांची यात्रा आज अमरावतीत आली होती. यावेळी त्यांनी ही मागणी केली.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी ही मागणी केली. अशा व्यक्तींना सरळ सरळ टाडा, पोटा लावला पाहिजे. हे विधान म्हणजे ब्रेकअप द नेशन आहे. सरकारने मागे पुढे न पाहता अशांना आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. मराठी माणूस यूपीत आहे. ओरिसात आहे, बंगालमध्ये आहे. मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात आहे. गुजरातमध्ये आहे. त्यांचं काय करायचं? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

दोन्हीकडून उठाव झाला तर?

त्यांचं हे विधान समाज दुभंगणार आहे. समाज दुभंगला तर देश दुभंगतो. त्यामुळे त्यांना यूएपीएचा कायदा आणि नॅशनल सेक्युरीटी ॲक्ट (रासुका) लावा. टाडा आणि रासुका ताबडतोब लावला पाहिजे. सरकारने हिंमत दाखवावी. अशा विधानामुळे दोन्ही भाषिकांमध्ये उठाव झाला तर काय होणार आहे? असा सवाल आंबेडकर यांनी केला.

ज्याचा त्याचा अधिकार

राज ठाकरे यांनी मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ज्याला त्याला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. आम्ही आमचं मत रॅलीतून मांडलं. राज ठाकरेंना आमच्या रथ यात्रेबाबत विचारलं पाहिजे. या रथ यात्रेबाबतची त्यांची भूमिका जाणून घेतली पाहिजे. पण तुम्ही ते विचारणार नाही. कारण तिथे ठोकशाही चालते. तिथे लोकशाही नाही चालतं, असा टोला त्यांनी लगावला.

तुमची मिलिभगत चालू द्या

शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असं विधान केलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी अशा कोणत्याही गोष्टीला शरद पवार यांनी हातभार लावू नये असं म्हटलं होतं. त्यावरही आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याची काळजी घेतली आहे. आज ठामपणे सांगतो महाराष्ट्रात मणिपूर होणार नाही आणि दंगली होणार नाही. तुमचा मिलीभगतचा खेळ चालू द्या. आम्हाला महाराष्ट्र शांत करायचा आहे. तो आम्ही करत आहोत, असंही ते म्हणाले.

शिंदेंचा स्ट्राईक रेट डबल

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीवरही त्यांनी भाष्य केलं. काँग्रेसला कणा नाही. कणा असता तर ते झुकले नसते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील निवडणुकीचा स्ट्राईक रेट पाहिला तर शिंदेंचा स्ट्राईक रेट डबल आहे. याचा अर्थ शिवसेनेची मते एकनाथ शिंदेंकडे राहिली आहेत. एकनाथ शिंदे यांनाच शिवसैनिक खरी शिवसेना मानत आहेत. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट आला तो आरक्षणवादी आणि मुस्लिमांमुळे. पण हा दोन्ही क्लास धर्मवादी पक्षांचा मतदार नाही. त्यामुळे काँग्रेसला कणा असता तर त्यांनी ही फॅक्ट त्यांच्या बैठकीत मांडली असती. पण काँग्रेसचा कोणताही नेता हे मांडायला तयार नाही, असं ते म्हणाले.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.