जालन्यातील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवा; राजेश टोपे यांचे आदेश

संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा कहर निर्माण केला आहे. (rajesh tope hold corona review meeting in jalna)

जालन्यातील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवा; राजेश टोपे यांचे आदेश
rajesh tope
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 3:17 PM

जालना: संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा कहर निर्माण केला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे एका व्यक्तीपासून अनेकांना संसर्ग होत असल्याने सर्वच जिल्हा प्रशासनांनी खबरदारीचे उपाय घेतले आहेत. जालन्यातही मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठवण्याचे निर्देशच जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. (rajesh tope hold corona review meeting in jalna)

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संतोष कडले, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अन्न व औषध प्रशासनविभागाच्या अंजली मिटकर आदी उपस्थित होते.

रेमडेसिवीरचा काळाबाजार होऊ देऊ नका

कोरोनाबधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात साठा उपलब्ध राहील यासाठी याची पुरेशी मागणी नोंदविण्यात यावी. जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक इंजेक्शनचा हिशोब ठेवण्यात यावा. इंजेक्शन्स सर्व सामान्यांना चढ्या भावाने विक्री होणार नाही तसेच याचा काळाबाजार होणार नाही तसेच जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश टोपे यांनी दिले.

कोरोना मृत्यू होऊ देऊ नका

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होत असल्याने त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांची प्रकृती खालावत असून अनेकप्रसंगी रुग्णांचा मृत्यूही होत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये न ठेवता त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर देण्यात येऊन कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ ठेवण्याबरोबरच नियमितपणे रुग्णांची तपासणी करण्याबरोबरच रुग्णांची कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगारांना प्रशिक्षण द्या

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यादृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या 400 बेडव्यतिरिक्त अधिकच्या 250 ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात येत असलेले बेड रुग्णांसाठी तातडीने उपलब्ध होतील, यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य तसेच डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार यांना प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्बंध व सूचनांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होईल, यासाठी पोलीस विभागाने काम करण्याच्या सूचना करत कंन्टेन्टमेंट झोनमध्ये निर्बंधाची अधिक कडकपणे अंमलबाजवणी करण्याबरोबरच मास्क, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कोरोना बाधितांच्या सहवासितांचा डाटा ठेवा

जालना जिल्ह्यात ट्रेसिंग व टेस्टिंगची संख्या वाढविण्यात यावी. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी आरटीपीसीआर लॅब असून या लॅबची दरदिवसाची क्षमता एक हजारपेक्षा अधिक स्वॅब तपासणीची असून दरदिवशी त्या प्रमाणात चाचण्या झाल्याच पाहिजेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाव्यतिरिक्त जालना शहरामध्ये अधिक प्रमाणात स्वॅब संकलन केंद्र उघडण्याच्या सूचना करत कोरोना बाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 20 व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. कोरोना बाधितांच्या सहवासितांचा डेटा नियमितपणे अपलोड होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याचे निर्देश देत जिल्ह्यात असलेल्या निवासी शाळामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने तातडीने घरी पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (rajesh tope hold corona review meeting in jalna)

लसीकरणात जालना नंबर वन असावा

45 वर्षावरील नागरिकांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्ह्यात दररोज किमान 25 हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात यावे. रविवारीसुद्धा लसीकरण होईल, याची दक्षता घेत लसीकरणामध्ये जालना जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. (rajesh tope hold corona review meeting in jalna)

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown Updates : मुख्यमंत्री आजच निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार : अस्लम शेख

‘महाराष्ट्रात 12-13 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता; परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये, सरकार तुमची काळजी घेईल’

VIDEO: भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते, पण धनंजय मुंडेला नाही; ढोबळेंचा घणाघात

(rajesh tope hold corona review meeting in jalna)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.