विदेशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी, देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्याची गरज : राजेश टोपे
देशांतर्गत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांवरही लक्ष देण्याची गरज असल्याचा सूर या बैठकीत उमटला. याबाबत अद्यापतीर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट अर्थात ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे राज्य सरकारने खबरदारी म्हणून निर्बंध जारी केले आहेत. आज झालेल्या बैठकीत धोकादायक देशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच देशांतर्गत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांवरही लक्ष देण्याची गरज असल्याचा सूर आजच्या बैठकीत उमटला. याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
डोमॅस्टिक प्रवाशांवरही लक्ष देण्यात यावं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच अन्य अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही प्रवाशी धोकादायक देशातून येत नाहीत. मात्र डोमॅस्टिक पॅसेंजर म्हणून आलेल्या प्रवाशांवरही लक्ष द्यायला हवं. डोमॅस्टिक प्रवाशांच्या बाबतीत वेगळी नियमावली काढण्यासंदर्भात केंद्र सरकार, भारत सरकारचा आरोग्य विभाग तसेच राज्य सरकार विचार करतील. एखादा व्यक्ती रिस्क कंट्रीतून आला नसेल तर त्याची तपासणी केली जात नाही. मात्र, तरीही पाच टक्के लोकांची टेस्ट करण्यास सांगितलं आहे. या सर्वांचा पासपोर्ट तपासून त्यांच्या तपासण्या करण्यात येणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही
तसेच आपल्या देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार डेंजर आहे हे सिद्धही झालं नाही. मी अभ्यास करून माहिती देत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. जे उद्योगधंदे सुरू आहेत. ते तसेच सुरू राहितील. त्यात काही बदल केला जाणार नाही. शिवाय येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझं याबाबत बोलणंही झालं आहे, असं टोपे यांनी सांगतिलं.
इतर बातम्या :
महिलांवरील अत्याचार वाढण्यास आघाडी सरकारच जबाबदार; चित्रा वाघ यांचा जोरदार हल्लाबोल
Maharashtra School Reopening | राज्यात शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार, शासन निर्णय जारी