omicron : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी जे करता येईल ते करणार, नियम पाळा, राजेश टोपेंचं आवाहन

ओमिक्रोनला रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या महामारीत अनुशासन आणि कोरोनासंदर्भात घातलेले नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. 

omicron : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी जे करता येईल ते करणार, नियम पाळा, राजेश टोपेंचं आवाहन
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 3:30 PM

मुंबई : सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनने बघता बघता देशासह महराष्ट्रात एन्ट्री केली. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा कामाला लागले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात काही सूचना केल्या आहेत. देशात सध्या ओमिक्रॉनचे एकूण 5 रुग्ण आहेत. त्यापैकी एक रुग्ण शनिवारी महाराष्ट्रात सापडला आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. त्या नियमांंचं काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे.

ऑमिक्रॉनचा संसर्ग वेगाने होण्याची शक्यता 

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनने काही दिवसातच जगातील अर्ध्याहून अधिक देशात प्रवेश केला आहे. त्याचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळून आला आहे. ओमिक्रोनला रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या महामारीत अनुशासन आणि कोरोनासंदर्भात घातलेले नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

ओमिक्रॉनने डेल्टाला रिप्लेस केलं

डेल्टाला रिप्लेस करण्याचे काम ओमीक्रोन ने केले आहे, ओमिक्रोनचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. डेल्टा व्हेरिएंटवर आपण मात केली, डेल्टाचे राज्यात रुग्ण कमी झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. परंतु ओमिक्रोनला रोखले नाही तर मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो आणि ओमिक्रोनला रोखण्यासाठी साठी जे जे करता येईल ते करावे लागणार, तसेच मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांंच्यात अजूनतरी ओमिक्रोनसंदर्भात बैठक झाली नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाऊन लागला आणि कित्येक दिवस घरात बसून काढावे लागले, तशी वेळ पुन्हा येऊ द्यायची नसेल तर नियमांंचं पालन होणे अत्यंत गरजेचे आहे.

पाकिस्तान दौऱ्यातून कायरन पोलार्डची माघार; वनडे आणि T20 मालिकेत दोन वेगवेगळे कर्णधार

BanLipstick | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक

Girish Kuber | ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, नाशकात साहित्य संमेलन परिसरात प्रकार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.