शेतकऱ्यांना बांधावरच खते द्या, पीक कर्ज वाटपात सबब नको, मालाचे ब्रँडिंग करा; बळीराजासाठी टोपे धावले

राज्यात कोरोनाचं संकट वाढत असतानाच पावसाळाही तोंडावर आला आहे. (rajesh tope tope review meeting for monsoon season)

शेतकऱ्यांना बांधावरच खते द्या, पीक कर्ज वाटपात सबब नको, मालाचे ब्रँडिंग करा; बळीराजासाठी टोपे धावले
rajesh tope
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 4:44 PM

जालना: राज्यात कोरोनाचं संकट वाढत असतानाच पावसाळाही तोंडावर आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे बळीराजासाठी धावले आहेत. त्यांनी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100 पीक कर्जाचं वाटप करण्याचे आदेश देतानाच शेतकऱ्यांना बांधावरच खताचे वाटप करण्याचे निर्देशही दिले आहेत. (rajesh tope tope review meeting for monsoon season)

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सोमवारी खरीप हंगाम आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीला अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषिविकास अधिकारी रणदिवे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे देशमुख, ईलमकर आदी उपस्थित होते.

मालाचे ब्रँडिंग करा

खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे तसेच खतांचे वाटप होईल, या दृष्टीने कृषी विभागाने काटेकोरपणे नियोजन करण्याबरोबरच बियाणांचा व खतांचा काळाबाजार होणार नाही तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाणांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या बियाण्यांची बाजारात विक्री न करता त्याच बियाणांचा पेरणीसाठी अधिक प्रमाणात वापर करण्याचे आवाहन टोपे यांनी केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करत असताना नवनवीन प्रयोग करून शेतीची उत्पादकता वाढविण्याची गरज असल्याचे सांगत जिल्ह्यात अधिकाधिक कृषी उत्पादक कंपन्यांची स्थापना होण्याची गरज असून यासाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. कृषी उत्पादक कंपनी स्थापन करून पिकवलेल्या मालाचे ब्रँडिंग करून माल आकर्षक पद्धतीने पॅक करून विक्री केल्यास त्या मालाला बाजारात अधिक चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कर्ज वाटपात कोणतीही सबब नको

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर योजना असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावून त्यांच्या आर्थिक उत्पप्नात भर पडण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही सांगतानाच पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. यासाठी जिल्ह्याला देण्यात आलेले पिककर्ज वाटपाचे उद्दीष्ट 100 टकके पूर्ण होण्यासाठी प्रत्येक बँकांना देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात यावे. कर्ज वाटपाच्या बाबतीत कुठलीही सबब ऐकून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्याने या वाटपाचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या बांधावर खते द्या

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी-अडचणीची वेळेत सोडवणूक होण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्षपणे काम करावे. शेतकऱ्यांना बांधावर खते वाटप होण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याबरोबरच फळबाग लागवडीपासून अधिक चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच कृषी पंपाच्या जोडणीचे उद्दिष्ट विद्यूत विभागाने वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आमदार निधीतून एक कोटी खर्च

जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असून बाधित व्यक्तींना चांगल्या प्रमाणात उपचार मिळावेत यासाठी आरोग्याच्या सेवा अधिक प्रमाणात वाढविण्यावर भर देण्यात येत असून प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट सुरू करण्यात येत आहे. आमदार निधीतून 1 कोटी रुपये कोविडसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली असल्याने प्रत्येक लोकप्रतिनिधी यांनी या माध्यमातून आवश्यक ती साधन सामुग्री खरेदी करावी. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेले औषधी, कोविड सेंटर, मनुष्यबळ आदी बाबी मुबलक प्रमाणात पुरविण्यात येत असून तालुक्यात याबाबत काही अडचणी असतील तर त्या कळवाव्यात त्याची त्वरेने पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले. (rajesh tope tope review meeting for monsoon season)

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कसं रोखायचं?; औरंगाबादमधील डॉक्टरांना मिळणार घाटीत प्रशिक्षण

रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची रुग्णांच्या नातेवाईकांना सक्ती करू नका; राजेश टोपे यांचे निर्देश

Photo : ‘ब्रेक द चेन’, औरंगाबादेत संचारबंदीला चांगला प्रतिसाद

(rajesh tope tope review meeting for monsoon season)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.