Rajyasabha Election : काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार जाहीर, महाराष्ट्रातून इम्रान प्रतापग्रही, राजस्थानातून मुकूल वासनिक, तामिळनाडूतून पी. चिदंबरम

काँग्रेसने रात्री उशिरा उमेदवरांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून जाहीर झालेलं नावं हे अपेक्षेप्रमाणेच सरप्राईजिंग आहे. कारण राज्यसभेसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून इम्रान प्रतापग्रही यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Rajyasabha Election : काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार जाहीर, महाराष्ट्रातून इम्रान प्रतापग्रही, राजस्थानातून मुकूल वासनिक, तामिळनाडूतून पी. चिदंबरम
काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार जाहीर. महाराष्ट्रातून इम्रान प्रतापग्रही
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 11:33 PM

मुंबई : राज्यसभेच्या (Rajyasabha Election) सर्व जागांचा सस्पेन्स आज अखेर संपला आहे. कारण सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसने (Congress) सर्वात शेवटी आपला उमेदवार जाहीर केला आहे. तसेच त्यांनी इतर राज्यांसहीत सर्व उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. शिवसेनेने आपले दोन उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार हे जाहीर केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडूनही प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपने आज आपले तीन उमेदवार जाहीर केले आहे. तर काँग्रेसने रात्री उशिरा उमेदवरांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून जाहीर झालेलं नावं हे अपेक्षेप्रमाणेच सरप्राईजिंग आहे. कारण राज्यसभेसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून इम्रान प्रतापग्रही (Imran Pratapgarhi) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत इम्रान प्रतापग्रही?

  1. मोहम्मद इम्रान प्रतापग्रही हे उर्दू भाषेतील कवी आणि मूळचे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते आहेत.
  2. प्रतापग्रही हे 2019 च्या निवडणुकीत मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले मात्र ते पराभूत झाले.
  3. इम्रान यांची 3 जून 2021 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  4. यावेळी काँग्रेसकडून त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसकडून कन्हैया कुमार यांचेही नाव चर्चेत होते. मात्र आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
  5. हे सुद्धा वाचा

6 जागासाठी 7 उमेदवार रिंगणात

  1. संजय राऊत, शिवसेना
  2. संजय पवार, शिवसेना
  3. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी
  4. इम्रान प्रतापग्रही, काँग्रेस
  5. पियुष गोयल, भाजप
  6. अनिल बोंडे, भाजप
  7. धनंजय महाडिक, भाजप

काँग्रेसकडून कुणाला कुठून उमेदवारी?

सातवी जागा कुणाला मिळणार?

भाजपने सुरूवातील आपले उमेदवार जाहीर करताना सावध पवित्रा घेत दोन नावं जाहीर केली. मात्र ऐनवेळी भाजपकडून आता धनंजय महाडिक हे तिसरे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सहा जागेसासाठी सात उमेदवार झाले आहे. तर सहाजिकच एका उमेदवाराला पराभवाच्या झळा सोसाव्या लागणार आहे. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी चांगली तयारी करण्यात आली आहे अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवून शिवसेना ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर आता भाजप कोणती खेळी करून अपेक्षित आकडा जमवण्याचा प्रयत्न करणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता या निवडणुकीची रंगत सात उमेदवरांमुळे वाढली आहे. एवढं मात्र नक्की. यातून कोण बाहेर जाणार हेही चित्र लवकरच स्पष्ट होईल.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.