AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत पण ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, रक्षा खडसेंची नाराजी

खासदार रक्षा खडसेंनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेचे स्वागत केले, पण गृहमंत्र्यांनी सोशल मीडियावर ती आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याने उघड नाराजी व्यक्त केली. (Raksha Khadse BJP)

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत पण 'ती' आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, रक्षा खडसेंची नाराजी
रक्षा खडसे, खासदार,भाजप
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 5:13 PM

जळगाव: अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी संकेतस्थळावरील आक्षेपार्ह उल्लेखाची दखल घेतली, ही चांगली बाब आहे. परंतु, दुसरीकडे मला वाईट या गोष्टीचे वाटले की त्यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, अशा शब्दांत भाजप खासदार रक्षा खडसेंनी (Raksha Khadse)आपली नाराजी व्यक्त केली. जळगावमध्ये रक्षा खडसे पत्रकारांशी बोलत होत्या.भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसेंच्या बाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याच्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याप्रश्नी आता राजकीय वतावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. (Raksha Khadse comment on derogatory reference on BJP official website)

बुधवारी रात्री हा प्रकार माझ्या लक्षात आला. माझ्याकडे हे मेसेज आले होते. हा प्रकार भाजपकडून केला गेलेला नाही. रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास ही माहिती आल्यानंतर भाजपचं अधिकृत पाहिल्यानंतर त्यावर कोणतीही चुकीची गोष्ट आढळली नाही. एखाद्या महिलेबद्दलची अशी गोष्ट सोशल मीडियावरुन शेअर करण्याची गरज नव्हती. भाजपकडून याबाबत अधिकृत खुलासा करण्यात येईल. जळगावचे पोलीस अधिक्षक तपास करतील. आम्ही या प्रकाराची सगळी माहिती घेत आहोत. गुगलवरुन हिंदीमध्ये भाषांतर केल्यानंतर तसं दिसत असल्याचं काही व्यक्तींच म्हणनं आहे. आम्ही या प्रकाराची माहिती घेत आहोत, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

काय म्हणाल्या रक्षा खडसे?

“भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर या विषयाबाबत मी तत्काळ पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झालेला नाही. माझ्याकडे व्हॉट्सअॅपवर याबाबत जे काही स्क्रीनशॉट आले, त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ म्हणून असलेल्या पेजवरुन व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरु आहे” असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा

“भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल”, असं अनिल देशमुख ट्विटरवर म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या:

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, गृहमंत्रीनिल देशमुखांकडून कारवाईचा इशारा

चावटपणा करणाऱ्याला आत टाका, रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप

वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख भाजपकडून नाही, रक्षा खडसेंचा दावा, पोलीस अधीक्षकांशी चर्चा

(Raksha Khadse comment on derogatory reference on BJP official website)

भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी.
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की....
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.