सुशांतप्रकरणी शिवसेना नेत्यांना आत्मसाक्षात्कार झालाय का?: भाजपचा खोचक सवाल
सुशांतप्रकरणाचा तपास सीबीआयने अजून पूर्ण केलेला नाही. तपास अजूनही सुरू आहे. तरी सुद्धा निष्कर्ष काढला जात आहे. महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना नेत्यांना कसली घाई झाली आहे? त्यांना नेमकं कुणाला वाचवायचं आहे?, असा सवालही राम कदम यांनी केला.
मुंबई: सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. असं असताना राज्य सरकारला निष्कर्ष काढण्याची एवढी घाई का झाली आहे?, सुशांतच्या कुटुंबीयांचा वारंवार अवमान केला जात असून शिवसेना नेत्यांनाही झालंय तरी काय?, असा सवाल करतानाच कदाचित शिवसेना नेत्यांना आत्मसाक्षात्काराचा आशीर्वाद प्राप्त झाला असावा, असा टोला भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेला लगावला आहे. (ram kadam on sushant suicide report)
अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा अहवाल एम्सने दिला आहे. हा अहवाल आल्यानंतर शिवसेनेने भाजपवर टीका केली होती. आजही दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी शिवसेना आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सुशांतसिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करण्याचा सामना आणि महाराष्ट्र सरकारने जणू विडाच उचलला आहे. शिवसेना नेत्यांना काय झालं माहीत नाही. कदाचित त्यांना आत्मसाक्षातकाराचा आशीर्वाद प्राप्त झाला असावा, अशी टीका राम कदम यांनी केली आहे.
पालघर प्रकरण असो की सुशांतसिंह प्रकरण. तपास पूर्ण व्हायच्या आधी निष्कर्ष काढण्याची सवय महाराष्ट्र सरकारला लागली आहे. सुशांतप्रकरणाचा तपास सीबीआयने अजून पूर्ण केलेला नाही. तपास अजूनही सुरू आहे. तरी सुद्धा निष्कर्ष काढला जात आहे. महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना नेत्यांना कसली घाई झाली आहे? त्यांना नेमकं कुणाला वाचवायचं आहे?, असा सवालही कदम यांनी केला.
शिवसेनेने भाजपला अग्रलेखातून झापले
एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस 110 दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. (ram kadam on sushant suicide report)
जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये! अशी खोचक टीकाही सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे.
Sushant Singh Rajput | सीबीआयवरही विश्वास नाही का?, संजय राऊतांचा सुशांतच्या वकिलांना टोलाhttps://t.co/cEIeuqvWPa@rautsanjay61 #SanjayRaut #VikasSingh #sushantaiimstape
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2020
संबंधित बातम्या:
आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल
एका नटीसाठी एक कायदा, बेटीच्या देहाची मात्र विटंबना : संजय राऊत
सुनील केदार ग्वाल्हेरचा गड लढवणार, ज्योतिरादित्य शिंदेंना थेट आव्हान
(ram kadam on sushant suicide report)