राम क्षत्रिय होता की नाही ? उत्तर कोणीच देत नाही, जितेंद्र आव्हाड म्हणतात…

| Updated on: Jan 17, 2024 | 2:27 PM

Jitendra Awad : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. त्या सोहळ्यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहे. 22 जानेवारी आणि रामचा काय संबंध...

राम क्षत्रिय होता की नाही ? उत्तर कोणीच देत नाही, जितेंद्र आव्हाड म्हणतात...
jitendra awhad,
Follow us on

नागपूर, दि.17 जानेवारी 2024 | रामासंदर्भात मी एकच प्रश्न विचारला. त्यानंतर माझ्यावर शिव्यांची लाखोली वाहिली गेली. वैचारिक लढाई लढायची नसते, असे आता झाले आहे. मी एक विचार मांडला की आई, बहिणीवरुन शिव्या मिळतात.  यामुळे आताच्या विपरित परिस्थिती शांत बसण्याशिवाय पर्याय नाही. कारण आता वैचारिक लढाई राहिली नाही. परंतु राम क्षत्रिय होता की नाही? त्याचे उत्तर देऊन टाका. ते उत्तर देण्यास कोणी पुढे येत नाही. राम आमचाच आम्ही जेव्हा म्हणतो, तेव्हा आमचाच म्हणतो. प्रत्येकाच्या मनात रामसंदर्भात आदराची कल्पना आहे. आई-वडिलांचे ऐकवणारा राम, वडिलांच्या शब्दाला मानणारा राम, विपरीत परिस्थितीत लढणारा राम आहे.

तुम्हाला हिंदू धर्म माहीत नाही

शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केले? जेव्हा असा प्रश्न आता विचारला जात आहे. तेव्हा त्याचे उत्तर काय द्यावे. आज जो हिंदू धर्म दिसत आहे तो आदी शंकराचार्यांमुळे आहे. हे पीठ आजपासून नाही, ते  आदिशंकराचार्यापासून आहेत आणि आता तुम्ही विचारत आहात शंकराचार्यांनी काय केले. तेव्हा म्हणावे लागते, तुम्हाला हिंदू धर्म माहीत नाही. आम्ही वैचारिक संघर्ष करायला तयार आहे. पण त्यांची तयारी नाही. लोकांनी बोलणे बंद केल्यावर या देशाचे लोकशाही संपले.

आम्ही 22 ला दर्शन का घेणार ?

अयोध्येत आम्ही 22 ला रामाचे दर्शन का घ्यावे ? आम्ही 23 ला जाऊन किंवा 24 ला जाऊन दर्शन घेणार आहे. राम मंदिरासाठी निमंत्रण कशाला पाहिजे. राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण का दिले नाही? रामाचा वनवासात संबंध आदिवासींसोबत आला. परंतु आज त्या आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण नाही. त्यांना विसरले आहे. रामच्या वनवासातील सर्वाधिक संबंध आदिवाशी लोकांशी आले होते.

हे सुद्धा वाचा

22 जानेवारीचे काय महत्व

22 जानेवारीचे काय महत्व आहे. हा काही पूजा पाठ करण्याचा दिवस नाही. 1970 पासून रामाच्या नावावर निवडणूक लढली जात आहे. आजपासून 40-45 दिवसांत निवडणुका जाहीर होतील. आता या लोकांनी पूजा केली त्यानंतर प्रसाद वाटतील. त्यानंतर रामाची पुस्तक काढून वाटतील. आम्ही विसरलो की राम मंदिराचे पहिले शिलाण्यास राजीव गांधी यांनी केले होते. दुसऱ्यांदा शिलाण्यास होत नाही. ज्या ठिकाणी मूर्ती उठवली गेली त्या जागेपासून 3 किलोमीटर दूर राम मंदिर निर्माण होत आहे. म्हणजे मुळ जागेवर मंदिर होत नाही, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.