जितेश अंतापूरकर यांना सहानुभूतीचा फायदा, जनतेचा कौल मान्य : रामदास आठवले

दादरा नगरहवेलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार पहिल्यांदाच निवडून आला आहे. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. जे लोकमत आहे ते मला मान्य आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला संपूर्ण देशात यश मिळालेय देगलूर मतदारसंघामध्ये अंतापूरकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांना सहानुभूतीची फायदा झाला, असे आठवले म्हणाले.

जितेश अंतापूरकर यांना सहानुभूतीचा फायदा, जनतेचा कौल मान्य : रामदास आठवले
ramdas athawale
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 7:56 PM

मुंबई : जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या आम्हाला संपूर्ण देशात यश मिळाले. देगलूर मतदारसंघांमध्ये अंतापूरकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जितेश अंतापूरकर यांना सहानुभूतीची फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. आमचा उमेदवार निवडून येईल अशी आम्हाला आशा होती,” असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला. येथे काँग्रेसचे उमेदवार उमेश अंतापूरकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला. तर भाजपचा उमेदवार पारभूत झाला. याच निकालानंतर आठवले यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत बोलत होते.

अंतापूरकरांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ

दादरा नगरहवेलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार पहिल्यांदाच निवडून आला आहे. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. जे लोकमत आहे ते मला मान्य आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला संपूर्ण देशात यश मिळालेय देगलूर मतदारसंघामध्ये अंतापूरकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांना सहानुभूतीची फायदा झाला. आमचा उमेदवार निवडून येईल अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु फायदा अंतापूरकर यांना झाला,” असे रामदास आठवले म्हणाले.

देशमुखांविरोधात ईडीला बरेच पुरावे मिळाले

तसेच पुढे बोलताना त्यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेवरदेखील भाष्य केले. ईडीने कारवाई केली आहे. ईडीला बऱ्याच प्रमाणात पुरावे मिळालेले आहेत. शंभर कोटीचा विषयदेखील बराच गाजला होता. अनिल देशमुख यांना ईडीने पकडलेले आहे. अनिल देशमुख यांनी कायदेशीर पद्धतीने आपली बाजू कायदेशीर पद्धतीने मांडली. पण देशमुखांवर कारवाई झालेली आहे,” असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

मालिकांच्या आरोपात बिलकुल तथ्य नाही

मागील काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. यावरदेखील भाष्य करत आठवलेय यांनी मलिक यांच्यावर टीका केली. “समीर वानखेडे यांचे कपडे कोट्यवधींचे आहेत, असा जावईशोध नवाब मलिक यांनी लावलेला आहे. नवाब मलिक यांनी जावईशोध लावण्याऐवजी समीर वानखेडे यांनी त्यांच्या जावयाचा शोध लावला. त्यांना ड्रगसच्या केस मध्ये पकडण्यात आले होते. नवाब मलिक यांना समीर वानखडे दररोज स्वप्नामध्ये दिसत आहेत. मालिकांच्या आरोपात बिलकुल तथ्य नाही,” असे आठवले म्हणाले.

ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली जाणार 

सध्या राज्यात सार्वजनिक कार्यक्रम कमी लोकांच्या अपस्थितीत पार पाडले जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी चौत्यभूमीवर काय खबरदारी घेण्यात आली, याचीदेखील त्यांनी माहिती दिली. चैत्यभूमी येथील नियोजन आणि कायदा सुव्यवस्था याबाबत पोलीस अधिकारी आणि मुंबई महापालिका रेल्वेचे अधिकरी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. राज्य सरकारने गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने कमी गर्दी ठेऊन, सोशल डिस्टन्सिंग ठेऊन नियमांचे पालन करण्यात येणार आहे. ऑनलाईन दर्शन देण्यात येणार आहे, असे आठवले म्हणाले. तसेच अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर चैत्यभूमीवर गर्दी करू नये, शक्यतो महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना आहे त्या ठिकाणाहून अभिवादन करावे,” असे आवाहनदेखील आठवले यांनी केले.

इतर बातम्या :

Bypoll Election Result | तीन जागांवर 3 पक्षांचे उमेदवार विजयी, लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कोणाची सरशी ?

Degloor Biloli Bypoll Election 2021 | काँग्रेसने करुन दाखवलं, विजयानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

….सारखं सारखं सगळीकडून चिमटं काढून कसं जमंल? अजित पवारांची शेरेबाजी ; पण कुणावर?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.