Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या भेटीनंतर साकारली गेली महायुती… रामदास आठवले यांनी उलगडले ते ‘राज’

लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत असणाऱ्या इतर राज्यातील सर्व पक्षांना जागा दिल्या. परंतु महाराष्ट्रात आमच्या पक्षाचा विचार झाला नाही. खरंतर मी साधा, भोळा व्यक्ती राजकारणात आहे. मला प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे डावपेच येत नाही.

बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या भेटीनंतर साकारली गेली महायुती... रामदास आठवले यांनी उलगडले ते 'राज'
ramdas athawale
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 2:53 PM

हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली होती. राज्यातील राजकारणात एक अनोखा प्रयोग होता. त्यानंतर राज्यातील राजकारणास वेगळीच दिशा मिळाली. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. नेमकी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र कशी आली? यासंदर्भात आजही अनेकांच्या मनात उत्सुक्ता आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भातील रहस्य उघड केले. ‘टीव्ही ९ मराठी डिजिटल’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत महायुती कशी साकारली गेली, ते त्यांनी सांगितले.

बाळासाहेबांची भेट घेतली अन्…

बाळासाहेब ठाकरे वांद्रे येथे राहतात. मी त्याच परिसरात राहत होतो. त्यामुळे बाळासाहेबांची भेट घ्यावी, असे मला वाटत होते. एकेदिवशी मी सरळ बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले, “बाबासाहेब आंबडेकर आणि माझे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मग आपण का वेगळे का असावे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली पाहिजे.” मी बाळासाहेबांना म्हणालो, “तुम्ही मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास विरोध केला होता. यामुळे आपल्याबद्दल आमच्या समाजात गैरसमज आहेत.” परंतु त्या भेटीनंतर मी रिपाईचे कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक, अधिकाऱ्यांची बैठक घेतल्या. त्यांच्यासमोर हा विषय मांडला. त्यानंतर राजकारणात असे धाडशी निर्णय घ्यावे लागतात, असे सर्वच जणांचे मत पडले. सर्वांनी आपण शिवसेना भाजपसोबत जाण्यास हरकत नाही, असे सांगितले. त्यावेळी शिवसेना-भाजपची दोन्ही पक्षांची युती होती. आम्ही त्यांच्यासोबत गेलो. त्यानंतर महायुती हे नाव मिळाले.

जुन्या मित्राकडे लक्ष दिले नाही

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना रिपाईचा विचार झाली नाही. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, २०१९ मध्ये विधासभेसाठी पाच आमदार दिले होते. आता २०२४ मध्ये ८ ते १० जागा आम्हाला देतील अशी अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत असणाऱ्या इतर राज्यातील सर्व पक्षांना जागा दिल्या. परंतु महाराष्ट्रात आमच्या पक्षाचा विचार झाला नाही. खरंतर मी साधा, भोळा व्यक्ती राजकारणात आहे. मला प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे डावपेच येत नाही. परंतु लोकसभेच्या जागावाटप चर्चेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर लोकसभेला जागा मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी सर्वांनी सांगितले, आपणास कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे सोबतच राहू या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एक मंत्रीपद, दोन महामंडळाचा चेअरमन तसेच जिल्ह्यातील कमिट्यांवर वाटा दिला जाणार असल्याचे आश्वसन दिले आहे.

हे सुद्धा वाचा

मी दोन पावले मागे आलो…

सत्तेत भागीदार मला मिळाली. परंतु लोकसभेत जागा मिळाल्या नाही. त्यानंतरही मी दोन पावले मागे आलो. परंतु हे लोक मागे येण्यास तयार नव्हते. तिन्ही पक्ष भांडत राहिले. मी माझा विषय दोन दिवसांत संपवला होता. काँग्रेसच्या काळात सहा एमएलसी आम्हाला मिळाल्या होत्या. पुण्यात उपमहापौर झाले होते. अनेक ठिकाणी नगराध्यक्ष आमचे होते. अजून आम्हाला संधी मिळावी. सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा आहे. दोन मित्र मिळाल्यानंतर आयपीआयचे नाव घेतले जात नव्हते. परंतु आता निवडणुकीत आरपीआयचे नाव घेतले जात आहेत.

राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर.
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा.