रामदास कदम यांच्या कुटुंबात फूट? भावाकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार, साई रिसॉर्टमध्ये महत्त्वाच्या घडामोडी

उद्धव ठाकरे यांच्या खेड दौऱ्यादरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडली. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली असली तरी रामदास कदम यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ठाकरेंचा सत्कार केला.

रामदास कदम यांच्या कुटुंबात फूट? भावाकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार, साई रिसॉर्टमध्ये महत्त्वाच्या घडामोडी
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 9:01 PM

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज रत्नागिरीतील खेड तालुक्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. खेड तालुका हा शिवसेनेच्या रामदास कदम यांचा मतदारसंघ. त्यांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या खेड दौऱ्यादरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडली. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली असली तरी रामदास कदम यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ठाकरेंचा सत्कार केला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

उद्धव ठाकरे यांचा सदानंद कदम यांच्या कुटुंबियांकडून सत्कार करण्यात आला. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे बंधू आहेत. रत्नागिरीत साई रिसॉर्टमध्ये ही भेट घेण्यात आली. त्यानंतर कदम कुटुंबियांकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे कदम कुटुंबातच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यावरुन मतभेद असल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या सभेत शिवसेना नेत्यांनी रामदास कदम यांच्यावर प्रत्यक्ष टीका केली. पण स्वत: उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर प्रत्यक्ष टीका करणं टाळलं. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना रामदास कदम यांचं नावही घेतलं नाही.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय-काय म्हणाले?

“काल परवा मिंदे बोलले की बरं झालं आमचं देशद्रोह्यांसोबत चहापान टळलं, मग सगळ्यांनी धुडगूस घातला. मग म्हणाले, तसं नाही. मी तुम्हाला उद्देशून बोललो नाही. अरे कसं बोलशील? बोललास तर आम्ही जीभ हासडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाही आहोत. देशप्रेमी आहोत. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंदेंना बोलतोय. राजव, वैभव, अनिल परब देशद्रोही आहेत? मुंबई वाचवणारे सैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटत आहेत?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“महाविकास आघाडी सरकार चांगल चाललं होतं. मग बिघडलं कुठे? माशी शिंकली कुठे? माशी एकाच ठिकाणी शिंकली, आज जसं राजन साळवी, बाकीचे आपले आमदार आहेत, नितीन देशमुख यांनी तर भर सभेत सांगितलं की, कसा त्यांचा छळ केला, अनिल परब आहेत, एक तोतरा येतो हातोडा घेऊन, खरा हातोडा तुला पेलेल का? आता स्वत:च्या डोक्यावर पडायची वेळ आलीय. पण छळायचं. राजन साळवींच्या घरी धाड. घराचं मोजमाप घेतात, किती फूट बाय किती फूट, आता परत 13 की 15 तारखेला कुटुंबियांना बोलावलं आहे. राजन साळवी का देशद्रोही आहेत?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार, तोतया आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिवसेना नाव चोरु शकाल असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही शिवेसना नाही चोरु शकत. धनुष्यबाण तुम्ही कदाचित चोरला असेल पण तो तुम्हाला पेलवेल असं अजिबात नाही. धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार?”, असा घणाघात त्यांनी केला.

“गोळीबार मैदान. मैदानाचं नाव खूप चांगलं आहे. पण मला शिवसैनिकांनी एक शिकलंय. ढेकण्या चेहऱ्याला गोळीबाराची गरज नसते. ढेकणं आपलं रक्त पिवून फुगलेली आहेत. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकण्यांना चिरडणार आहे. तोफेची काय गरज आहे? या तोफा आहेत ना. मुलखमैदान तोफा आहेत. आज सुद्धा दोन-तीन तोफा गडाडल्याच ना. भास्कर जाधव, गिते आहेत, सुषमा अंधारे आहेत. संजय कदम आता आणखी एक तोफ आपल्यासोबत आलेली आहे. पण तोफा या देशद्रोह्यांविषयी वापरायच्या असता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“दुर्देवं असं की ज्यांना आपण कुटुंबीय मानलं. ज्यांना मोठं केलं. त्यांनीच आपल्या आईवर वार केलाय. होय, शिवसेना ही आपली आई आहे. शिवसेना ही चार अक्षरं नसती तर तुम्ही-मी कोण होतो? आज जे टिमक्या वाजवत आहेत की, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. तुमचा जन्म तेव्हा कदाचित झाला असेल, मुंबईनंतर पहिला भगवा इथे फडकला होता”, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढली.

“तुम्हाला तुमचा गर्व असेल की, आम्ही शिवसेना बांधली तर घ्या स्वीकारा आव्हान, शिवसेना नाव बाजूला ठेवा. तुमच्या आई-वडिलांचा नाव लावा जर त्यांना तुमची लाज वाटत नसेल तर आणि पक्ष बाधून दाखवा. मी तर उघडपणे बाहेर पडलो आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे”, असं आव्हान त्यांनी दिलं.

“ज्या तत्वावर शिवसेना त्यांची असं म्हटलं आहे ते तत्वच झूठ आहे. शिवसेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही तर माझ्या वडिलांनी केलेली आहे. निवडणूक आयुक्तांचे वडील कदाचित त्या ठिकाणी बसले असतील पण ते तुमचे वडील असतील माझे वडील नाहीत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

“जे शिवसेना तोडण्याचा फोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही नेमकं काय करताय ते तुम्हाला लक्षात येत नाहीय. तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न नाही तर तुम्ही मराठी माणसाच्या एकजुटीवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही हिंदूंच्या एकजुटीवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“ज्यांना आजपर्यंत जे जे शक्य होईल ते दिलं, तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं तरीसुद्धा ते खोक्यांमध्ये बंद झाले. माझ्या हातात आज काही नाही. माझे हात आज रिकामे आहेत. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात. याच्यासाठी पूर्वजांची पुण्यायी असावी लागते. आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. तुमची साथ-सोबत मला पाहिजे”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.