Nagaar Panchayat: दापोलीत शिवसेना नेते रामदास कदमांना धक्का, पालकमंत्री अनिल परबांची सरशी, काय आहे चित्र?

रत्नागिरीः जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीची निवडणूक शिवसेना नेते रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील संघर्षामुळे गाजत आहे. आज निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून यात रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे. दापोली नगरपंचायत निवडणुकीतील एकूण जागांपैकी शिवसेनेनं 6 जागांवर विजय मिळवला आहे. अनिल परब यांच्या पाठिंब्यातून […]

Nagaar Panchayat: दापोलीत शिवसेना नेते रामदास कदमांना धक्का, पालकमंत्री अनिल परबांची सरशी, काय आहे चित्र?
शिवसेना नेते रामदास कदम आणि अनिल परब
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 11:33 AM

रत्नागिरीः जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीची निवडणूक शिवसेना नेते रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील संघर्षामुळे गाजत आहे. आज निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून यात रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे. दापोली नगरपंचायत निवडणुकीतील एकूण जागांपैकी शिवसेनेनं 6 जागांवर विजय मिळवला आहे. अनिल परब यांच्या पाठिंब्यातून 11 पैकी 9 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे. रामदास कदम आणि अनिल परब या दोन नेत्यांसाठी ही निवडणूत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. अजूनही काही जागांचे निकाल येणे बाकी असून पुढील काही तासात या निवडणुकीचे निकाल आणखी स्पष्ट होतील.

दापोलीतील निकाल आतापर्यंत-

एकूण जागा-17 भाजप- 1 शिवसेना- 6 काँग्रेस-0 राष्ट्रवादी- 8 इतर(अपक्ष)- 2

दापोलीत बहुरंगी लढत

दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाने आघाडी केली असून भाजप येथे स्वबळावर लढत आहे. तर काँग्रेस, मनसे आणि शिवसेना बंडखोर अशी बहुरंगी लढत या ठिकाणी पहायला मिळत आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना बाजूला ठेवत सगळी सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे दिली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

इतर बातम्या-

Nagar Panchayat Election result 2022: केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांना धक्का; दिंडोरीत शिवसेना नंबर एक…!

Rohit Pawar | ‘निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही’ असं रोहित पाटील म्हणाले होते, झालंही तसंच!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.