मुंबईतील नामांकित हॉटेलात साऊथ इंडियन पेहरावाला मज्जाव; रामराज कॉटनच्या अध्यक्षाकडून तीव्र निषेध

मुंबई | 8 डिसेंबर 2023 : सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राम नावाच्या एका इसमाने One8 Commune रेस्टॉरंटमधील अनुभव शेअर केला आहे. मुंबईतील उच्चभ्रू भागात असलेले हे रेस्टॉरंट बरंच लोकप्रिय आहे. मात्र ज्याने हा व्हिडीओ शेअर केला, तो या रेस्टॉरंटमध्ये साऊथ इंडियन लोकांचा पेहराव असलेले धोतर किंवा वेस्थी घालून त्या हॉटेलमध्ये […]

मुंबईतील नामांकित हॉटेलात साऊथ इंडियन पेहरावाला मज्जाव; रामराज कॉटनच्या अध्यक्षाकडून तीव्र निषेध
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 2:30 PM

मुंबई | 8 डिसेंबर 2023 : सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राम नावाच्या एका इसमाने One8 Commune रेस्टॉरंटमधील अनुभव शेअर केला आहे. मुंबईतील उच्चभ्रू भागात असलेले हे रेस्टॉरंट बरंच लोकप्रिय आहे. मात्र ज्याने हा व्हिडीओ शेअर केला, तो या रेस्टॉरंटमध्ये साऊथ इंडियन लोकांचा पेहराव असलेले धोतर किंवा वेस्थी घालून त्या हॉटेलमध्ये पोहोचला. मात्र त्या पेहरावामुळे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये एंट्री मिळाली नाही, असे त्याने कथितरित्या त्या व्हिडीओमध्ये नमूद केले आहे. आता याच मुद्यावरून खळबळ माजली आहे. रामराज कॉटनचे अध्यक्ष आणि संस्थापक, के.आर. नागराजन यांनी हा व्हिडीओ पाहून यासंदर्भात दु:ख व्यक्त केले आहे. तसेच सर्वांनी एकमेकांप्रती समजूतदारपणा दाखवावा आणि एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करावा, अशी विनंती त्यांनी केली.

वेस्थी किंवा धोतराचे महत्व सांगताना, के.आर. नागराजन यांनी भारताच्या महान संस्कृतीतील मुळांवर भर दिला. शतकभरापूर्वी महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अंहिसा हे प्रथम शस्त्र वापरले. मात्र अहिंसे नंतरचे दुसरे सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणून महात्मा गांधींनी याच धोतराचा स्वीकार केला आणि या वस्त्राने स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली, असे नागराजन यांनी नमूद केले. वेस्थी किंवा धोतर हे केवळ भारताच्या संस्कृतीचेच प्रतिनिधित्व करत नाही तर ते असंख्य विणकरांचे उपजीवीकेचे साधनही असल्याचे त्यांनी सांगितले. तमिळनाडू, भारतात आणि जागतिक स्तरावर वेस्तीला त्याचे पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी रामराज कॉटनने चार दशकांहून अधिक काळ प्रयत्न केले आहेत.

कोणी काय घालावे हा ज्याचा त्याच प्रश्न

एखाद्या व्यक्तीने, कोणते, काय कपडे घालावेत हा त्यांचाय वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळाले आहे, या मुद्यावर प्रकाश टाकत के.आर. नागराजन यांनी One8 Commune व्यवस्थापनाकडे मार्मिक शब्दांत कैफियत मांडली. ” मी One8 Commune च्या व्यवस्थापनाला अशी विनंती करतो की , त्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये असलेले धोतर किंवा वेस्थीचे महत्व समजून घ्यावे. तसेच जे लोक हा ( धोतर) पेहराव घालून तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येतील त्यांच्याशी दयाळूपणे आणि आदराने वागावे.” असे मतही के.आर. नागराजन यांनी व्यक्त केले.

तसेच भारताचा वारसा आणि संस्कृतीचा स्वीकार आणि आदर करण्याची विनंती त्यांनी व्यवस्थापनाला केली. सार्वजनिक जागी सांस्कृतिक संवेदनशीलता आणि सर्वसमावेशकतेची गरज असल्याचे श्री. राम यांच्यासंदर्भात घडलेल्या प्रकारावरून अधोरेखित होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.