शरद पवार देणार अजित पवारांना जोरदार धक्का, थेट आज दिले असे संकेत…आता ही असणार मोहीम

Sharad Pawar and Ajit Pawar: आता मी फलटणला जाणार आहे. जो कार्यक्रम इंदापूरला झाला, तोच फलटणला घेणार आहे. तिथे महिनाभर कार्यक्रम बुक आहे. सर्वजण एकत्र येत आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले.

शरद पवार देणार अजित पवारांना जोरदार धक्का, थेट आज दिले असे संकेत...आता ही असणार मोहीम
शरद पवार आणि अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 2:24 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी सोमवारी भाजपला धक्का दिला. भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. त्यानंतर शरद पवार यांनी आपला मोर्चा अजित पवार यांच्या नाराज असलेल्या नेत्यांकडे वळवला आहे. आता शरद पवार यांनी भाषणात बोलताना पुढील लक्ष कोण असणार? तेच स्पष्टपणे सांगितले. आता मी फलटणला जाणार आहे. जो कार्यक्रम इंदापूरला झाला, तोच फलटणला घेणार आहे. तिथे महिनाभर कार्यक्रम बुक आहे. सर्वजण एकत्र येत आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले.

रामराजे अजित पवार गटात नाराज

विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत. त्यांनी महायुतीत आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार जाहीरपणे केली. तसेच अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी आमदार दीपक चव्हाण यांना जाहीर केली. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर नाराज आहेत. त्यांनी आपण कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून त्यात मोठा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. आता शरद पवार यांनी इंदापूरमधून रामराजे त्यांच्या पक्षात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

काय म्हणाले शरद पवार

हर्षवर्धन बोलता बोलता बोलता म्हणाले, काही काम आम्हाला द्या. काहीही काम करायला हर्षवर्धन कशाला. कठिण काम असेल, लोकांच्या जीवनमरणाचं काम असेल तर हर्षवर्धनला देऊ. तुम्हाला आता ते करावं लागेल. तुम्ही हर्षवर्धन यांना विधानसभेत पाठवा. मी फिरतोय. मला निवडणूक लढायची नाही. मला १४ वेळा निवडून दिलं. मला स्वत:साठी काही नको.

हे सुद्धा वाचा

मला राज्याचा चेहरा बदलायचा आहे. लोकांचं जीवनमान बदलायचं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी आहे. ते जर करायचं असेल तर ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, प्रशासन आहे, अशा लोकांची गरज आहे. त्यामुळे अशा लोकांना विधानसभेत त्यांना सोपवण्याचं तुमचं काम आहे. राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्याचं काम माझं आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.