Lok Sabha Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार चर्चेतून वाद, वादानंतर हाणामारी, एकाचा मृत्यू

Lok Sabha Elections 2024 : रामटेक लोकसभा मतदार संघात असणाऱ्या सिंगारखेडा गावातील पारावर तरुणांमध्ये चर्चा सुरु होती. लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला. वादाची ठिणगी पडली आणि वाद वाढून हाणामारीमध्ये बदलला.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार चर्चेतून वाद, वादानंतर हाणामारी, एकाचा मृत्यू
election
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 8:20 AM

लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा आता २५ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीतील महाराष्ट्रातील पाचही टप्पे पूर्ण झाले आहेत. यामुळे आपल्या मतदार संघात कोण निवडणूक जिंकणार? यावरुन चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेक जण हाच उमेदवार जिंकणार? असा दावा करत पैज लावत आहेत. या सर्व चर्चा ४ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. परंतु या चर्चेतून निर्माण झालेल्या वादात हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना विदर्भातील रामटेक लोकसभा मतदार संघात घडली. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. हाणामारीत सतीश फुले तरुणाचा मृत्यू झाला आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झाले. या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे आणि काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे रिंगणात आहेत. या मतदार संघातील नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात निवडणूक कोण जिंकणार? यावरुन गावातील तरुणांमध्ये चर्चा सुरु होती. लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार चर्चेतून वाद झाला. वादानंतर हाणामारी झाली. त्यानंतर एकाने प्राण गमवला आहे.

गावातील पारावर चर्चा पण….

रामटेक लोकसभा मतदार संघात असणाऱ्या सिंगारखेडा गावातील पारावर तरुणांमध्ये चर्चा सुरु होती. लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला. वादाची ठिणगी पडली आणि वाद वाढून हाणामारीमध्ये बदलला. या हाणामारीत सतीश फुले तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी प्रवीण बोरडे याला पोलिसांनी सावरगावमधून ताब्यात घेतले आहे.

हे सुद्धा वाचा

प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी

निवडणुकीनंतर आता सर्व जण निकालाची वाट पाहत आहे. ४ रोजी रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने चांगली कंबर कसली आहे. मतमोजणी संदर्भात प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिल जात आहे. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये कर्मचाऱ्यांना निवडणूक अधिकारी बॅलेट वरील मतदान कसं मोजायच त्यातील वैध आणि अवैध मतदान कसं ठरवायचं त्याचे नियम काय, ईव्हीएम मशीन मधील मतदान कसं मोजायचा या सगळ्या बाबीचे प्रशिक्षण दिलं जात आहेत. नागपूर शहरात नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. त्यासाठी टेबलची रचना कशी असेल कोणाची काय जबाबदारी सगळ्या बाबीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.