किनवटमधील रासप उमेदवार गोविंद जेठेवाडा यांचा विषारी औषध घेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न

किनवटमधील राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराकडून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न झाला आहे. किनवटचे रासप उमेदवार गोविंद जेठेवाडा यांच्याकडून विषारी औषध प्राशन करुन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न झाला आहे.

किनवटमधील रासप उमेदवार गोविंद जेठेवाडा यांचा विषारी औषध घेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न
किनवटमधील रासप उमेदवार गोविंद जेठेवाडा यांचा विषारी औषध घेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 6:04 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता जवळ येत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात येत आहे. राज्यातील मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचारांच्या सभा पार पडत आहेत. पण किनवटमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे किनवट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोविंद जेठेवाडा यांनी अतिशय टोकाचा निर्णय घेतला आहे. जेठेवाडा हे विधानभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यावर विश्वास दाखवत रासपचे प्रमुख नेते महादेव जानकर यांनी त्यांना किनवट विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडून प्रचारही करण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. पण असं असताना आज अचानक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोविंद जेठेवाडा यांनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किनवटचे रासप उमेदवार गोविंद जेठेवाडा यांच्याकडून विषारी औषध प्राशन करुन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न झाला आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गोविंद यांनी असा प्रयत्न का केला असावा, यामागे काही राजकीय किंवा सामाजिक कारण आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान, गोविंद जेठेवाडा यांना उपाचारासाठी तेलंगणाच्या आदिलाबाद येथे हलविण्यात आलं आहे. गोविंद लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांच्या समर्थकांकडून देवाकडे प्रार्थना केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

रासप स्वतंत्र निवडणुकीच्या भूमिकेत

रासप प्रमुख महादेव जानकर यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी आपली भूमिका जाहीर केली आहे. महायुतीत जागावाटपात आपल्याला लक्षात घेतलं जात नाही, असा आरोप करत महादेव जानकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. कितीही झालं तरी आपण स्वतंत्र निवडणूक लढणार, असा एल्गार महादेव जानकर यांनी पुकारला होता. त्यानुसार जानकरांनी अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांचा प्रचारही सुरु झाला आहे. पण असं असताना अचानक रासपच्या एका उमेदवाराने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केल्याने रासप पक्षात खळबळ उडाल्याची माहिती आहे. दरम्यान, गोविंद जेठेवाडा यांनी इतक्या टोकाचा निर्णय घेण्यामागचं कारण काय होतं ते शोधण्यात पोलिसांना यश येतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.