राजीनामा देऊ नका, संघाची फडणवीसांना विनंती, महाराष्ट्राच्या राजकारणात आता RSS सक्रिय

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील राजकारणाच्या मैदानात उतरला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना राजीनामा न देण्याची विनंती केली आहे.

राजीनामा देऊ नका, संघाची फडणवीसांना विनंती, महाराष्ट्राच्या राजकारणात आता RSS सक्रिय
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 5:02 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचंड नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात झालेला पराभव हा देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जिव्हारी लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. राज्यात आगामी चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा मूड नेमका काय आहे? हे पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील सर्वाधिक नागरिकांनी नाकारलं आहे. याउलट जनतेने महाविकास आघाडीला भरघोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

लोकसभेच्या निकालाचे आकडे पाहून देवेंद्र फडणवीस नाराज झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोडायची आहे. त्यांना संपूर्ण राज्य पिंजून काढायचं आहे. गाव-खेड्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने आपल्याला मोकळं करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पण फडणवीस यांच्या सारखा मुरब्बी आणि हुशार नेता सरकारमधून बाहेर पडणं योग्य नसल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. उपमुख्यमंत्री असताना फडणवीस यांना पक्षासाठी काम करता येईल, असं भाजपचं म्हणणं आहे. पण फडणवीस आपल्या राजीनाम्याच्या मतावर ठाम आहेत.

संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली फडणवीसांची भेट

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आता या कामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील लागला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील राजकारणाच्या मैदानात उतरला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची नागपुरात धरमरेठ निवासस्थानी बैठक पार पडली आहे. जवळपास दोन तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. यावेळी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या पराभवावर चर्चा झाली. यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर आज त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन केल्याची माहिती समोर आली होती. फडणवीसांनी अमित शाह यांच्याकडे आपली भूमिका मांडली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीत अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्यावर ठाम असल्याने या घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. आता फडणवीस खरंच राजीनामा देतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.