TET Exam : टीईटी घोटाळ्याचे रेट आधीच ठरले, ऑडिओ क्लिपने खळबळ; कशी झाली सेटिंग?
एमपीएससी समन्वय समितीचे सदस्य योगेश जाधव आणि एका एजंटच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमधील आवाज योगेश जाधव यांचाच असल्याचं निश्चित सांगता येत नाही. पण त्यांच्या नावाने ही क्लिप व्हायरल होत आहे.
पुणे : टीईटी परीक्षा घोटाळ्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत इतरांनाही अटक करण्यात आली आहे. ही घटना ताजी असतानाच आता टीईटी घोटाळ्याशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एमपीएससी समन्वय समितीचे सदस्य योगेश जाधव आणि एका एजंटच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमधील आवाज योगेश जाधव यांचाच असल्याचं निश्चित सांगता येत नाही. पण त्यांच्या नावाने ही क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमधील संभाषणातून शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराने कसं पोखरलं गेलं हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. टीईटीच्या टेस्टबाबत एक अॅक्टिव्हिटी आहे. येत्या 21 तारखेला टीईटीची टेस्ट आहे. अगोदर ही काम करता येतील. थोडं सेट करून फास्ट करता येतं. तुला जसं पाहिजे तसं करेन, असं या दोघांचं संभाषण आहे. त्यातून टीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.
कथित संभाषण जसंच्या तसं
पहिला: तुला म्हाडाचे रेट मागितले होते. दुसरा: तुला टाकले होते ना व्हॉट्सअॅपवर पाहतो की नाही तू. अरे तू काय येडा माणूस आहे का? तुझ्या तीन चार व्हॉट्सअॅप नंबरवर रेट टाकलेत तू पाहिलेच नाही अजून पहिला: या नंबरवर टाक बरं दुसरा: याच नंबर टाकलेत पण तुझं व्हॉट्सअॅपच चालू नाही येड्या पहिला: नाही ते 8888 नंबरवर टाकलं का? दुसरा: सगळ्या नंबरवर टाकलंय तुझ्या व्हॉट्सअॅपच्या पहिला: नाही रे मला आलाच नाही दुसरा: तुला दाखवू का स्क्रिनश शॉट… अरे तू बघितलंच नाही व्हॉट्सअॅप. तुला नंबर 1 पासून नंबर 24 पर्यंतचे रेट टाकलेत. ते रेट ऑब्लिक केले आहेत. त्यांनी आपल्याला कमी करून दिले, पुन्हा कमी करून रेट दिले. पहिला: बरं दुसरा: विशेष म्हणजे एडीट वगैरे काही केलेलं नाही. तुला तसेच पाठवले आहेत. तुझ्या लक्षात आलं पाहिजे काय आहे ते. पहिला: बरं बरं बरं एक काम कर ना… माझे दोन नंबर बंद आहेत. दुसरा नंबर देतो. त्यावर टाक ना दुसरा: माझी काहीच गलती नाही ना. मी तुला त्याच दिवशी टाकलेत पहिला: पण मी पाहिलेच नाही. काय झालं असेल ते. पुन्हा येणार नाहीत. रिसिव्ह होणार नाही ना ते दुसरा: रिसीव्ह झाले तुला पण डबल टाकतो. नंबर सांग तुझा काय तो पहिला: व्हॉट्सअॅप आहे. पण संध्याकाळी मी गेल्यावरच ते ओपन होईल. दुसरा: कधी ओपन झाल्यावर फोन कर मी तुला टाकतो परत पहिला: तुझ्याकडे दोन नंबर आहेत ना व्हॉट्स अॅपचे माझे दुसरा: तुझे तीन नंबर आहेत माझ्याकडे. तीन नंबर दाखवतो तुला. सांगू का तुला नंबर एक एक…