Ratnagiri Corona Patient | मुंबईच्या रुग्णाचा दापोलीत थरार, पळून गेलेला कोरोना रुग्ण 13 तासांनी जंगलात सापडला

दापोली तालुक्यातील बोरीवली वरची वाडीतील येथील शाळेत विलगीकरण कक्षात असलेला एक रुग्ण पळून गेल्याने एकच खळबळ होती.

Ratnagiri Corona Patient | मुंबईच्या रुग्णाचा दापोलीत थरार, पळून गेलेला कोरोना रुग्ण 13 तासांनी जंगलात सापडला
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 10:15 PM

रत्नागिरी : दापोलीतील विलगीकरण कक्षातून पळून गेलेला कोरोना रुग्ण (Dapoli Escaped Corona Patient Found) तब्बल 13 तासांनी गावाजवळील जंगलात सापडला आहे. दापोली तालुक्यातील बोरीवली वरची वाडी येथील शाळेत विलगीकरण कक्षात असलेला एक रुग्ण पळून गेल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, तो रुग्ण अखेर प्रशासनाने घेतलेल्या शोध मोहिमेमुळे सापडला आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थांनी (Dapoli Escaped Corona Patient Found) सुटकेचा नि:श्वास सोडला.

बोरीवली वरची वाडी गावातील एका मोबाईल टॉवरच्या खाली दुपारी 1 च्या दरम्यान हा रुग्ण सापडला. त्यानंतर तात्काळ त्याला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी दापोली येथे आणण्यात आले, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली. विलगीकरण कक्षातून पळालेल्या या रुग्णावर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

दापोली येथे काल एकूण चार रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. त्यातील हा रुग्ण पळून गेल्याने चिंता वाढली होती. त्या पॉझिटिव्ह रुग्णाला आणण्यासाठी रात्री रुग्णालयातून गाडी आणि कर्मचारी गेले होते. त्यावेळी बाहेर जाऊन येतो, असं सांगून या रुग्णाने पळ काढला होता (Dapoli Escaped Corona Patient Found). मात्र, स्थानिक ग्रामस्थ, प्रशासन पोलीस कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करुन अखेर त्या रुग्णाला शोधून काढले. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोळ पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील पवार आणि पीएसआय दीपक कदम यांच्या सह अनेकांनी मोलाची कामगिरी केली.

बोरीवली ग्रामस्थांनी अतिशय उत्तम काळजी घेत तेथील शाळेत बाहेरुन येणाऱ्या सगळ्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. जवळपास 28 जणांना येथे ठेवले असून त्याच ठिकाणी हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता. हा रुग्ण मुंबईतून दापोलीला गेला होता. मात्र, तो पळून गेल्याने रात्रीपासून त्याला शोधण्यासाठी प्रशासन कर्मचारी, पोलीस ग्रामस्थ (Dapoli Escaped Corona Patient Found) शर्थीचे प्रयत्न करत होते.

संबंधित बातम्या :

Corona | सोलापुरात कोरोनाचा कहर, 32 दिवसात 300 रुग्णांचा टप्पा पार, आठवड्याला सरासरी 70 नवे रुग्ण

कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

Aurangabad Corona : औरंगाबादमध्ये सकाळपर्यंत 55 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ

Covid-19 हेल्पलाइन ते ताप तपासणी केंद्र, कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलिसांसाठी गृहमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...