राऊत आमच्या कुटुंबाचा भाग, पण आमच्यात कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत; सुजित पाटकर EXCLUSIVE

सुजित पाटकर म्हणाले की, आता जमीन कुणाच्या नावावर, याचे उत्तर दोन दिवसांत देणार आहे. स्वप्ना पाटकर आणि वर्षा राऊत यांच्या नावावर ती जमीन आहे. चौकशी सुरू आहे. त्यावर बोलणं आता योग्य नाही. पण त्यांनी मला जे प्रश्न विचारले, त्याची उत्तरं मी दिली.

राऊत आमच्या कुटुंबाचा भाग, पण आमच्यात कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत; सुजित पाटकर EXCLUSIVE
नारायण राणे आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 10:40 AM

मुंबईः शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. मात्र, आमच्यात कोणतेही आर्थिक व्यवहार नाही, असा खुलासा आज सुजित पाटकर (Sujit Patkar) यांनी केलाय.संजय राऊत यांनी शिवसेना भवनासमोर पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उडवून दिली. त्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी भाजपमध्ये अक्षरशः चढाओढ लागलीय. त्यात काल किरीट सोमय्या यांनी सकाळी साडेनऊला पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर दुपारी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी राणे यांनी राऊत हे कुठलाही पुरावा नसताना आरोप करतात. त्यांनी मला सांगावं की ती 50 एकर जमीन कशी आली? सुजीत पाटकर कोण आहे आणि त्यांच्या कंपनीत राऊतांच्या मुली डायरेक्टर कशा? असे अनेक उपस्थित केले आहेत. आता याचे उत्तर स्वतः सुजित पाटकर यांनीच टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिले आहे. तसेच स्वतः काही ट्वीटही केले आहेत.

काय म्हणतात पाटकर?

पाटकर यांनी नारायण राणे यांच्या प्रकरणावर ट्वीट केले आहे. ते म्हणतात की, मी राणेंची पीसी पाहिलेली नाही. राणेंनी माझ्यावर वक्तव्य केलं होतं. मी कोणंय ते. म्हणून मी टाकलं ट्वीटवर. की त्यांनी मला जाणून घ्यायचं असेल, तर मी त्यांनी मला भेटावं. त्यांना काही प्रश्न असतील तर कुठेही सांगा मी भेटेन. माझ्या मताप्रमाणेत राऊत बाळासाहेबांना गुरू मानतात. कुणाच्या म्हणण्यानं राऊत बिखरणार नाहीत. राऊतांनी उत्तरं दिली आहेत. राणे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी थोडा अभ्यास करावा. त्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू नये. माझ्यासारख्या क्षुल्लक माणसांकडे कशाला महत्त्व् देता, असा सवालही केला आहे.

राणेंचा शून्य अभ्यास

पाटकर पुढे म्हणतात की, माझ्या मताप्रमाणे शून्य अभ्यास करून राणेंनी पत्रकार परिषद घेतली. राऊतांचे आमच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. ते आमच्या कुटुंबाचा भाग, पण आमचे आर्थिक संबंध नाहीत. 14 वर्षांपूर्वी माझ्या बायकोच्या त्यांच्या बायकोच्या नावावर एक जमीन घेण्यात आली होती. माझं आणि त्यांचं काहीही बिझनेस रिलेशनशिप नाही. मी त्यांना लोन दिलं होतं. वर्षा राऊतांना 30 लाख रुपयांचं लोन देण्यात आलं होतं. काही माझे डिसप्युट सुरू आहेत. मी दोन दिवसांत याबाबत सगळी माहिती माध्यमांना देईन.

काय दिला इशारा?

पाटकर पुढे म्हणाले की, आता जमीन कुणाच्या नावावर, याचे उत्तर दोन दिवसांत देणार आहे. स्वप्ना पाटकर आणि वर्षा राऊत यांच्या नावावर ती जमीन आहे. चौकशी सुरू आहे. त्यावर बोलणं आता योग्य नाही. पण त्यांनी मला जे प्रश्न विचारले, त्याची उत्तरं मी दिली. किरीट सोमय्या, राणेंनी लाईफलाईन कंपनीत मी एक भागिदार असल्याचे म्हटले होते. त्यावर तुमच्या कंपनीत मुली भागीदार आहेत का, असा प्रश्न पाटकर यांना विचारला असता ते म्हणाले की, मुलींच्या सोबत भागीदारी करण्यात प्रोब्लेम नाही. पण त्यांच्याशी माझी कोणतेही बिझनेस ट्रानझॅक्शन नाहीत. त्यामुळे आता मी डिफमेशन केस करणार आहे. त्यांनी अभ्यास करून आरोप करावा. यावर दोन दिवसांत सनसनाटी खुलासा करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.