अजितदादा नॉटरिचेबल कधी होणार? आमदार रवी राणांनी दिवस सांगितला; मोदी, शहा, पवार, अजितदादा आतल्या घडामोडी काय?

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना समाधानकारक काम करता आले नाही, असा आरोप रवी राणा यांनी केलाय. ते म्हणाले, ' अजित पवार यांचा श्वास 33 महिन्याच्या मविआ सरकार सोबत गुदमरलेला आहे....

अजितदादा नॉटरिचेबल कधी होणार? आमदार रवी राणांनी दिवस सांगितला; मोदी, शहा, पवार, अजितदादा आतल्या घडामोडी काय?
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 4:42 PM

स्वप्निल उमप, अमरावती : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. देशातले अनुभवी नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासहित सगळेच नेते नव-नवीन भाकितं करत आहेत. या सगळ्या दाव्यांचा केंद्रबिंदू आहेत अजित पवार. आत काहीतरी घडतंय, ज्याचे परिणाम थेट महाराष्ट्राचं राजकारण बदलण्यात होतील, असं म्हटलं जातंय. गेल्या आठवड्यात नॉट रिचेबल झालेले अजित पवार आज पुन्हा एकदा एकाएकी कार्यक्रमांना गैरहजर राहिलेत. प्रकृती अस्वस्थ्याचं कारण दिलं जातंय. पण अजित पवार कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा आहे. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी तर या पक्षप्रवेशाचा दिवस कधी आहे, हेदेखील सांगितलंय..

अजित पवार भाजपात कधी जाणार?

सध्या राजकारणातील चर्चांवर प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा म्हणाले, अजित पवार हे शरद पवार यांच्याच परवानगीने भाजपात येतील. जेव्हा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हिरवा कंदील देतील तेव्हा अजित पवार भाजपसोबत येतील. आणि हा हिरवा कंदील केव्हाही येऊ शकतो. त्याच दिवशी अजित पवार नॉट रिचेबल होतील, असा दावा राणा यांनी केलाय.

अजित पवार यांचा श्वास गुदमरलेला..

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना समाधानकारक काम करता आले नाही, असा आरोप रवी राणा यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ अजित पवार यांचा श्वास 33 महिन्याच्या मविआ सरकार सोबत गुदमरलेला आहे. पवार साहेबांचे मोदींचे संबंध काय आहे हे सर्व देशाला माहित आहे. कुठलाही राजकीय भूकंप म्हटल्यापेक्षा ही भाकीतच होतं..उद्धव ठाकरेंसोबत सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार यांनी मन लावून काम केलं नाही कारण ते सरकार कामच करत नव्हतं.. उद्धव ठाकरे यांच्या एकिच्या धोरणामुळं अजित पवार यांनी पाहिलेले स्वप्न अपुरे राहिले . आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येऊन अजित पवार अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार, असं भाकितही रवी राणा यांनी केलंय.

अजित पवार यांनी ८ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचा दावा काही वृत्तपत्रांनी केलाय. त्यानंतर अजित पवार यांच्याविरोधातील कारवाई थंडावल्याचं म्हटलं जातंय. माझ्या कुटुंबियांवर दबाव आणला जातोय, असं शरद पवार यांनीही मान्य केलंय. तेव्हापासून अजित पवार १५ आमदारांचा गट घेऊन भाजपात प्रवेश करण्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. यावरून रवी राणा यांनी आतील घडामोडी सांगितल्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.