…म्हणून मी मातोश्रीबाहेर बेशरमाचं झाड लावणार, आमदार रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका
म्हणून मी आता मातोश्रीसमोर जाऊन बेशरमाचं झाड लावणार असल्याचं रवी राणांनी जाहीर केलंय. रवी राणांच्या टीकेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालंय.
अमरावतीः अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीकास्त्र सोडलंय. मुख्यमंत्री वारंवार सांगूनही ऐकत नसेल आहेत म्हणून मी आता मातोश्रीसमोर जाऊन बेशरमाचं झाड लावणार असल्याचं रवी राणांनी जाहीर केलंय. रवी राणांच्या टीकेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालंय. (Ravi Rana Criticize On cm uddhav thackeray on swapnil lonkar)
येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीच्या बाहेर बेशरमाचं झाड लावणार
रवी राणांनी फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. कोरोनाच्या काळात ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार झाला, अनेकांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावल्या. महाराष्ट्रातल्या शेतकरी, शेतमजूर, स्वप्नील लोणकरसारख्या युवकांच्या आत्महत्येचा राज्याचे मुख्यमंत्री दखल घेत नसतील तर मी स्वतः येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीच्या बाहेर बेशरमाचं झाड लावणार आहे. एखादा माणून जर ऐकत नसेल आणि स्वतःची वाह वाह करून घेत असेल अशा माणसाच्या घरासमोर मी लवकरच बेशरमाचं झाड लावणार आहे, असंही रवी राणा म्हणालेत.
स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला एक कोटी त्वरित द्यावे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव या तिघांनाही माझं सांगणं आहे की, स्वप्नील लोणकर हा गरीब कुटुंबातील आहे. स्वप्नीलच्या आईनं त्याला शिकवण्यासाठी कर्ज काढलं होतं. ते कर्ज फेडू शकत नसल्यानं स्वप्नील लोणकरनं आत्महत्या केली. स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला एक कोटी त्वरित द्यावे, अशी मी मागणी केली होती, जेणेकरून त्या कुटुंबाला आधार होईल. स्वप्नील लोणकरवर मुख्यमंत्री काही बोलले नाहीत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलीय, त्यावरही मुख्यमंत्री काही बोलत नाही. मुख्यमंत्री फक्त स्वतःची वाह वाह करून घेत असल्याची टीकाही रवी राणांनी केलीय.
संबंधित बातम्या
MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या
Ravi Rana Criticize On cm uddhav thackeray on swapnil lonkar